लक्ष्मी पाटील लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित
लक्ष्मी पाटील लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित
नांदेड येथील नानक साई फाउंडेशन ने घेतली कार्याची दखल
कोल्हापूर/मारुती फाळके
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सतत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नांदेड येथील नानक साई फाऊंडेशनने आभाळमाया सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्या हस्ते संत नामदेव लाईफटाईम अँचिवमेंट पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले.
नांदेड येथे नानक साई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासना च्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव मराठी साहित्य संमेलन झाले. संमेलनात संत नामदेव लाईफटाईम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक फ. मु.शिंदे होते. संमेलनात संत नामदेव महाराज यांचे साहित्य व त्यांची श्री गुरु ग्रंथ साहिब मधील बाणी, विचार याबाबत विचारमंथन, चर्चा, व्याख्यान, विविध विषयावर परिसंवाद, कथाकथन, कवीसंमेलन, ग्रंथदिंडी आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी फौंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, राजकुमार चौगले, जी. नागय्या, सुभाष बल्लेवार, प्रा राजेश मुखेडकर, प्रफुल्ला बोकारे, विश्वनाथराव भोसीकर, विनायक पाथरकर, डॉ गजानन देवकर, पुंडलिकराव बेलकर, आप्पाराव कदम, दावलबाजे, अशोक अंगुलवार, तुकाराम कोटूरवार, दिलिप अनगुलवार, बर्मानंद अनमोड, तुकाराम मूरकुटे, वर्षा मूरकुटे, चंद्रकांत पवार, श्रेयसकुमार बोकारे, दिपक ओंढेकर, गंगाधर पांचाळ, गोविंदराव राऊत उपस्थित होते.










