March 24, 2026

प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांकडे आता मोबाईल ॲप

0
IMG-20240208-WA0018

प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांकडे आता मोबाईल ॲप

सॉफ्टवेअर,कोअर बँकिंग आणि मोबाईल ॲप चे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,सहकार निंबधक प्रेरणा शिवदास, समरजित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर/मारुती फाळके

बदलाच्या तंत्रज्ञानानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेने सभासदांच्या हातात मोबाईल ॲप देत सहकार क्रांती केली आहे.अद्ययावत,पारदर्शक कोअर बँकिंग सॉफ्टवेअर बदलाचा मोठा धाडसी निर्णय नूतन राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या नेतृत्वाखाली चेअरमन, व्हा चेअरमन,सर्व संचालक यांनी घेऊन प्राथमिक शिक्षक बँकेला आधुनिक दिशा दिली आहे. असे मत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी व्यक्त केले
त्या प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर येथील प्रधान कार्यालयात आयोजित कोअर बँकिंग, सॉफ्टवेअर व मोबाईलची ॲप उदघाटन समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.

शेंडकर पुढे म्हणाल्या,शिक्षकांच्या सहकारी संस्था या प्रत्येक सभासदांच्या प्रगती ला हातभार लावत असतात, त्यासाठी या संस्था टिकणे आणि त्यात वृद्धी होणे गरजेचे आहे.यासाठी सर्व संचालकांनी सभासदांभिमुख कारभार करावा.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास म्हणाल्या, रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकाराला सामोरे जात असताना प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने व कार्यरत संचालक मंडळाने सभासदाभिमुख कारभाराची सुरुवात दाखवून देऊन सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. बँकेचा एन पी ए कमी झाला असून, कर्ज वसुली, कर्ज वाटप,ठेवी,व्यवसाय यामध्ये प्रगती झाली आहे .काटकसरीचा कारभार करून संस्थेचे हित जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे करवीर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील म्हणाले, मोबाईल ॲप बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून प्राथमिक शिक्षक बँकेने प्रस्थापित बँकेच्या कार्यप्रणालीशी बरोबरी साधली आहे. आता सर्व व्यवहार प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभासदांच्या मोबाईलवर दिसण्यात कोणतीच कसूर राहणार नाही,यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत होईल.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागत संचालक बाळासाहेब निंबाळकर प्रास्ताविक सुनील एडके यांनी केले.

शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील म्हणाले, नवीन सॉफ्टवेअर व मोबाईलची माहिती देताना सभासदांनी या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन आपला वेळ आणि श्रम यांची बचत करावी,बँकेचा सर्व पारदर्शी कारभार एका क्लिक वर सभासदांच्या मोबाईलवर दिसणार आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी या अत्याधुनिक मोबाईल ॲप चा वापर बँकेच्या व्यवहारासंबधी करावा,असे आवाहन केले.

 

कार्यक्रमास के.डी. सी. चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे, आयडीबीआय चे रिजनल मॅनेजर विक्रम भिडे, अमित शहा, शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदूम ,संतोष काळे, बँकेची आयटी टीम सॉफ्टवेअर कंपनी सपोर्ट टीम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन अमर वरुटे, संचालक एस व्ही पाटील, शिवाजी रोडे- पाटील,बाळकृष्ण हळदकर, अर्जुन पाटील, गजानन कांबळे, नंदकुमार वाईंगडे, बाबू परीट, रामदास झेंडे,गौतम वर्धन, सुरेश कोळी ,शिवाजी बोलके, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, तज्ञ संचालक तानाजी घरपणकर, सतीश तेली यासह सुकाणू समितीचे जोतीराम पाटील,रघुनाथ खोत, विलास चौगुले,रवीकुमार पाटील,मधुकर येसने, कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे संचालक सुनील पाटील,बाजीराव पाटील,संजय कुर्डूकर,सचिन कोल्हापुरे,अर्जुन जानकर,कृष्णात धनवडे, मंगेश धनवडे,बालाजी पांढरे,प्रमोद पाटील,संतोष गायकवाड,चंद्रकांत पाटील,हेमंत भालेकर,विक्रम पोतदार,रामचंद्र मोहिते, सदाशिव कांबळे,संजय जगताप, शिवाजी पाटील,किरण शिंदे, उपस्थित होते.

(फोटो ओळी- प्राथमिक शिक्षक बँकेच्या सॉफ्टवेअर, मोबाईल अँप व कोअर प्रणालीचे उद्घाटन करताना मीना शेंडकर, प्रेरणा शिवदास,समरजित पाटील,शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील,व्हा.चेअरमन अमर वरुटे, सर्व संचालक,सुकाणू समिती आदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!