March 24, 2026

ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील-सरुडकरांचे नाव निश्चित!

0
IMG-20240403-WA0041(1)

ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील-सरुडकरांचे नाव निश्चित!

निष्ठावंत शिवसैनिकाला संधी

भेडसगाव/मारुती फाळके

गेली कित्येक दिवस चर्चेच्या फेऱ्या होत अखेर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांचे नाव निश्चित झाले आहे. ही घोषणा आज मंगळवारी दुपारनंतर करण्यात आली.

सत्यजित पाटील- सरुडकर गेली अनेक वर्षे शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. शिवाय त्यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील- सरुडकर यांनी दिर्घकाळ शाहूवाडी -पन्हाळा मतदारसंघाचे नेतृत्व केले. विश्वासराव नाईक साखर कारखाना,गोकुळ, शिवसेनेच्या माध्यमातून  त्यांचा या मतदारसंघात  जनसंपर्क आहे. शिवाय सत्यजित पाटील यांचा साधेपणा, ग्रामीण भागाबरोबर वाड्या वस्त्यावरील जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क  या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत., या मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील
यांच्याकडून मिळणारे पाठबळ, आम. मानसिंगराव नाईक, माजी आम. शिवाजीराव नाईक यांची भूमिका,हातकणंगले तुन माजी आमदार सुजित मिनचेकर, शिरोळ मधून माजी आमदार उल्हास पाटील यांचे पाठबळ, यामुळे सरुडकरांचे नाव पक्के झाले. सरूडकर यांच्या रूपाने हातकणंगले मतदारसंघात तगडा,धडपडणारा उमेदवार देऊन ठाकरे यांनी या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.

सत्यजित पाटील यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातुन उमेदवारी मिळाल्यामुळे ३५ वर्ष खासदार राहिलेले दिवंगत खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्यानंतर सत्यजित पाटील यांच्या रूपाने जिल्हयाच्या राजकारण पटलावर आणि दिल्ली दरबारी शाहूवाडीकरांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

मतदारसंघातील उमेदवार निश्चिती झाली असून महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार शेट्टी, वंचितकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील आणि काही क्षणापूर्वी ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. नव्या राजकीय समीकरणात माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांचे नाव निश्चित झाल्याने पुन्हा एकदा खासदार उदयसिंह गायकवाड यांच्यानंतर शाहूवाडीचे नाव लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहूवाडीचे सुपुत्र असलेले दिवंगत खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी नेतृत्व केले होतें,१५ वर्ष आमदार व ३५ वर्ष खासदार अशी उदयसिंहराव गायकवाड यांची राजकीय कारकीर्द संस्मरणीय ठरली.

         या मतदारसंघात गावागावात महाविकास आघाडीतील सहभागी घटक पक्षांचा गट आहे,याचा फायदा सत्यजित पाटील यांना होणार हे निश्चित आहे.,शाहूवाडी, शिराळा, वाळवा,पन्हाळा,वाळवा,हातकणंगले, शिरोळ तालुक्यात शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे गठ्ठा मतदान आहे या बळावर सत्यजित मैदान मारू शकतात,पूर्वेकडील तालुक्यात जैन मताचे विभाजन झाले, जातनिहाय मतदानाचे एकूणच पडसाद उमटले तर सत्यजित पाटील यांचे संसदेत भाग्य उजळू शकते असे राजकीय जानकार भाष्य करत आहेत.

एकूणच सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे तुल्यबळ लढत होणार हे मात्र निश्चित!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!