March 24, 2026

भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी १ लाखांचा नफा -हंबीरराव पाटील

0
IMG-20231229-WA0037(2)

भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी १ लाखांचा नफा -संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील

अल्पावधीत ३०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करणारी महाराष्ट्रातील नामांकित संस्था

सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे यशस्वी वाटचाल

भेडसगाव/मारुती फाळके

अल्पावधीत ग्राहकांच्या मनात पारदर्शी व विश्वासार्ह कारभाराचा वस्तुपाठ निर्माण केलेली सहकारातील मानबिंदू गौरव पुरस्कार प्राप्त, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे यशस्वी वाटचाल करत ओळख निर्माण केलेल्या भेडसगाव नागरी पतसंस्थेला या आर्थिक वर्षात निव्वळ नफा दोन कोटी एक लाख इतका झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील – भेडसगावकर यांनी दिली.

ते म्हणाले, संस्थेकडे सध्या मार्च २०२४ अखेर भाग भांडवल व निधी १७ कोटी ३५ लाख असून गतवर्षीच्या तुलनेत या ठेवीमध्ये १३.८८% वाढ होऊन एकूण ठेवी १६० कोटी १४ लाख इतक्या झाले आहेत. तसेच कर्ज वाटपामध्ये १९.४८% वाढवून १०५ कोटी ६८ लाख इतके कर्ज वाटप केले आहे.तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे संस्थेने सध्या संस्थेने ९७.३९% कर्ज वसुली केली असून संस्थेचा नेट एनपीए १.७०% इतका राखण्यात यश मिळवले आहे.

संस्थेच्या व्यवसायामध्ये १६.०४% नी वाढ होऊन मिश्र व्यवसाय २६५ कोटी पर्यंत पोहोचला आहे.तसेच संस्थेने एकूण ठेवीच्या ४५.१८% म्हणजे ६७ कोटी ५४ लाख इतकी गुंतवणूक केली आहे .

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यवसाय वाढीची ध्येय धोरणे निश्चित करून वर्षभर वसुली यंत्रणा गतिमान करून नियोजन आणि सातत्यपूर्ण कामामुळे थकबाकी २.६१% व नेट एनपीए १.७० टक्के राखण्यात यश मिळवले आहे.यावेळी त्यांनी संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या ठेवीदार, कर्जदार, सभासदांचे सहकार्याबद्दल आभार मानले.

संस्थेमार्फत मयत सभासदांच्या वारसांना मदत, आजारी सभासदांना मदत निधी, कर्मचारी व सभासद यांचा मेडिक्लेम व संस्था कर्मचाऱ्यांना दहा लाखाचे विमा संरक्षण इत्यादी सेवा सुविधा पुरवल्या जातात.

संस्थेच्या कार्याची व प्रगतीची दखल घेऊन शासनाने संस्थेला सहकार विभागामार्फत देण्यात येणारा ‘सहकारातील मानबिंदू’ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पाऊले गतिमान करत संस्थेने आरटीजीएस, एनएफटी, मोबाईल ॲप, एसएमएस सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

संस्थेला सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कार्यक्षेत्र दर्जा मिळाला असून अत्याधुनिक सेवा पुरवत २० शाखांद्वारे महाराष्ट्रात ग्राहकांना सेवा देण्याचे काम संस्था करीत आहे. पुढील आर्थिक वर्षाअखेर २०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करून ३२५ कोटींचा मिश्र व्यवसाय पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन पांडुरंग डांगे,प्रथम लोकनियुक्त सरपंच अमरसिंह पाटील, संग्राम पाटील, संस्थेचे जनरल मॅनेजर संजय पाटील,सर्व संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

————————————————

व्यवसायवृद्धी व शाखाविस्तारावर भर देणार- हंबीरराव पाटील
नुकत्याच संस्थेने मुंबई शहरांमध्ये कल्याण, मानखुर्द,विरार या ठिकाणी नव्या ३ शाखा सुरू केल्या आहेत.पारदर्शी कारभार,चोख व्यवस्थापन, व्यवसायवृध्दी, ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे भेडसगाव पतसंस्था नावारूपास आली आहे.यापूर्वी मुंबईत डिलाईल रोड,कोपरखैराणे या २ शाखा यशस्वीपणे सुरू आहेत.मुंबईत ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे नव्या ३ शाखा सुरू केल्या आहेत.आजवरच्या अनेक नामांकित संस्था या शहराकडून ग्रामीण भागाकडे येतात पण भेडसगाव पतसंस्था ही एकमेव संस्था ग्रामीण भागातून शहराकडे यशस्वी आगेकूच करत असलेली एकमेव पतसंस्था आहे.सुसज्ज, अद्ययावत असलेल्या दर्जाच्या शाखा, ग्राहकाभिमुख व्यवहार, सचोटीच्या कारभारावर सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे दमदार वाटचाल सुरू केली असून सध्या संस्थेकडे स्वतःचे भक्कम भागभांडवल आहे.

अल्पावधीतच ३०० कोटी व्यवसायाकडे वाटचाल करणारी पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था म्हणून संस्था प्रगतीपथावर आहे.सध्या संस्थेच्या अद्यावत संगणकीकृत २० शाखा असून मुदत ठेव ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.,तसेच भविष्यात संस्थेचा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात शाखाविस्तार, व्यवसायवृध्दी यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

हंबीरराव पाटील-भेडसगावकर
संस्थापक चेअरमन- भेडसगाव नागरी पतसंस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!