March 24, 2026

डॉ. आय.सी.शेख यांनी प्रशासनाची  माणूसपणाशी सांगड घातली -डॉ. सुनिलकुमार लवटे

0
IMG-20240414-WA0054(1)

डॉ. आय.सी.शेख यांनी प्रशासनाची  माणूसपणाशी सांगड घातली -डॉ. सुनिलकुमार लवटे

सेवानिवृत्ती निमित्त सदिच्छा समारंभ

कोल्हापूर /मारुती फाळके

  ‘डॉ. आय सी शेख’ यांनी अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्यातील माणूसपण हरवून दिलं नाही, असे प्रतिपादन शिक्षण तज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले.राम गणेश गडकरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.आय.सी .शेख यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लवटे बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सीमा येवले होत्या.
यावेळी बोलताना डॉ. सुनिलकुमार लवटे म्हणाले , ” शिक्षकाने आपल्या जीवनात ज्ञानदानाचे काम करत असताना शिक्षकाला आई होता आलं पाहिजे.संवेदनशील शिक्षकच चांगला विद्यार्थी,चांगला नागरिक घडू शकतो . डॉ. आय. सी. शेख यांनी शिक्षक व अधिकारी म्हणून ही संवेदनशीलता जपली . ”

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सीमा येवले म्हणाल्या , ” कामातील निर्दोष,निटनेटकेपणा व संयम या त्रिसूत्रीमुळे डॉ.आय.सी. शेख आपल्या ३५ वर्षाच्या सेवेमध्ये चांगला शिक्षक व अधिकारी म्हणून काम करू शकलो.शिक्षक व अधिकाऱ्यांनी आपल्या कामात या त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे “

मानपत्र , गौरव चिन्ह , कोल्हापुरी फेटा , शाल व श्रीफळ देऊन डॉ. आय.सी. शेख यांचा शिक्षणतज्ञ व जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ. सिमा येवले यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. आय.सी .शेख म्हणाले , ” छत्रपती शाहू महाराजच्या नगरीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे भाग्य मला लाभले व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या शासकीय पातळी अव्वल ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ”

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी केले. राजेंद्र कोरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.यावेळी प्राचार्य आर आर भोई , गजानन शिदे , प्रा. गीतांजली पाटील ,रमेश कोरे , सुधाकर सावंत , भरत रसाळे प्रसाद पाटील इत्यादी मनोगते व्यक्त केली.
प्राचार्य मंजुषा माळी यांनी मानपत्राचे वाचन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास शिक्षक नेते कृष्णात कारंडे, सुरेश कोळी,प्रसाद पाटील,प्रमोद तोउंदकर,राजेंद्र कोरे,शिक्षक बँकेचे संचालक एस व्ही पाटील,सुरेश कोळी, गजानन कांबळे, शरद केनवडे,सुधाकर सावंत तसेच शिक्षण विभागांतील अधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी केले . राजेश वरक यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले .

(फोटो ओळीं-डॉ. आय.सी. शेख यांचा सेवानिवृत्तीपर गौरव समितीच्या वतीने सत्कार करत असताना डॉ. सुनीलकुमार लवटे सेबत डॉ. सीमा येवले प्राचार्य प्रभाकर हेरवाडे , प्राचार्य आर आर भोई आदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!