March 24, 2026

पर्यावरण संवर्धनासाठी’ पुरोगामी शिक्षक संघटनेचे एक पाऊल

0
IMG-20240609-WA0076

पर्यावरण संवर्धनाचा’ पुरोगामी शिक्षक संघटनेचा संदेश

राज्यभर ५०हजार झाडे लावणार- प्रसाद पाटील

कोल्हापूर/मारुती फाळके
राज्यातील शिक्षकांची महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना ही एक प्रमुख संघटना. संघटनेचे नेटवर्क कमी अधिक प्रमाणात राज्यभर. शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना नेहमी प्रयत्नशील. संघटनेने आता पर्यावरणपूरक पाऊल उचलले आहे. यंदा राज्यात ५० हजार रोपांची लागवड करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. झाडे लावा-झाडे जगवा’या घोषणेचा हा कृतीशील धडा पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणारा आहे.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा कणकवली येथे राज्य नेते विजय भोगेकर यांचे उपस्थितीत नुकतीच झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते. बैठकीत निसर्गातील वाढते तापमान व वाढलेली वृक्षतोड यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

बैठकीस राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, जी एस मंगनाळे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने, राज्य संघटक प्रकाश पाटील, राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर , सुरेश साळवी, संघटनेचे रायगड जिल्हा नेते गोविंद पाटील , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के पाटील, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार , वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा ,अमरावती जिल्हाध्यक्ष महेंद्र हिवे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यशवंत पेंढारकर, जिल्हाध्यक्ष संघर्ष सावरकर, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर, प्रदिप पवार, तुषार पाटील, गंगाधर बोढे, संभाजी पाटील , नितीन पेढेकर ,जीवन भोयर , गजानन चिंचोळकर, सुभाष अडवे, किरण राठोड , बालाजी हाळदे , देवराव अमोदे, गोकुळ चारथ, लक्ष्मण खोब्रागडे, किशोर यनगंटीवार, लक्ष्मण सुरपाम, शिक्षक सहकारी पतसंस्था भद्रावती चेअरमन जगदीश ठाकरे , बाबा रणसिंग, नाथ मोरे ,मनोज पवार उपस्थित होते. संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्हा नेते अशोक जाधव यांनी आभार मानले. राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांनी सूत्रसंचालन केले.
…………………..
बैठकीतील अन्य ठराव…
शिक्षकांची रिक्त पदे १००% भरावीत, संच मान्यतेचे अन्यायकारक निकष रद्द करावेत. बालाकाच्या मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी चे वर्ग विनाअट जिल्हा परिषद शाळेस जोडावेत, इयत्ता ६ वी ते ७ वी अथवा इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गांना विनाअट ३ शिक्षक मंजूर करावेत, आंतरजिल्हा ७ वा टप्पा लवकरात लवकर सुरू करावा, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ मुक्त करावे, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना शिपाई पद मंजूर करावे, सर्व केंद्र शाळांना क्लार्कचे मंजूर करावे, शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा, जून व डिसेंबर मध्ये वर्षातून २ वेळा पदोन्नती घेण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना व्हावेत, नवीन भरतीतील उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश. व्हावेत आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!