नवीन संचमान्यता’ विरोधात शिक्षक समितीचे १५ जून ला लक्षवेधी निदर्शने
‘नवीन संचमान्यता’ विरोधात शिक्षक समितीचे १५ जून ला लक्षवेधी निदर्शने
कोल्हापूर/प्रतिनिधी
१५ मार्च २०१४ चा संच मान्यतेचा शासन निर्णय अन्यायकारक आहे तो माघार घ्यावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ जून रोजी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर व विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले,आर्थिक बचतीच्या नावाखाली संचमान्यतेच्या आडून शिक्षक संख्या कमी करण्याचा शासनाचा कुटील डाव आहे.
१५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यता शासननिर्णय गोरगरीबांचे शिक्षण संपवणारा आहे.
या सुधारित निर्णयातील काही अन्यायकारक बाबी नमूद केल्या
महाराष्ट्राच्या विकासाला, प्रगतीला, खोडा घालणारा संचमान्यता शासन निर्णय आहे.याचा विचार आमच्या बरोबर पालकांनी सुद्धा करावा आपल्या मुलांना/
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तो त्यांचा अधिकार आहे म्हणून १५जून २०२४ च्या आंदोलनामध्ये पालकांनी सुद्धा उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले.
BLO व नवसाक्षरता या अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा. विद्यार्थ्यांना शिकू दया. शिक्षकांना शिकवू या यास्तव आंदोलन संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी आंदोलन करीत आहोत. समूहशाळा व कन्या व कुमार शाळा कोल्हापुरान एकत्रिकरण होणार असून त्यास विरोध करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याचे निर्गतीकरण व्हावे.
शिक्षक समितीतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी, एकाच वेळेला आंदोलन करुन शिक्षकांच्या विविध विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
’पंधरा मार्च २०२४ रोजीचा संच मान्यतेचा निर्णय हा जुलुमी आहे. संच मान्यतेचा निर्णय हा सर्वांसाठी घातक असून ग्रामीण शिक्षणावर घाला घालणारा आहे. शिक्षकांना ड्रेसकोड, ऑनलाइन कामाचा ससेमिरा लावणे यासह अन्य विषयांच्या सोडवणुकीसाठी आंदोलन पुकारले आहे. नवभारत साक्षरता अभियान सारखे अभियान राबवून शिक्षकांना विद्यार्थ्यापासून दूर ठेवण्याचा डावपेच सरकारचा आहे. शिवाय समूह शाळाच्या नावाखाली गरीब मुलांचे शिक्षण संपविण्याचा सरकारचा घाट आहे.” या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात शिक्षकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेस
प्रमोद तौदकर,अर्जुन पाटील, गणपती मांडवकर,वर्षा केनवडे,बाबासाहेब खोत , विनायक मगदूम, प्रमोद भांदिगरे, हरिदास वर्णे,संजय पाटील,संजय कडगांवे , युवराज काटकर , अस्मिता मगदूम, संजय कुंभार, सचिन कोल्हापुरे , सिद्धार्थ पाटील, सुकुमार मानकर, शरद केनवडे, धनाजी सासणे, , आनंदा डाकरे,
संतोष पाटील, राजकुमार चौगले आदी उपस्थित होते.










