जिल्हा बँकेच्या ठेवी संकलनात शाहूवाडी तालुक्यात भेडसगाव शाखा प्रथम
जिल्हा बँकेच्या ठेवी संकलनात शाहूवाडी तालुक्यात भेडसगाव शाखा प्रथम
भेडसगाव/ प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या ठेवी संकलनामध्ये उदिष्टापेक्षा अधिक ठेवीचे संकलन करत भेडसगाव शाखेने ठेवी संकलनामध्ये शाहूवाडी तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. दरम्यान शाखेच्या य कामगिरीबद्दल बँकेचे अध्यक्ष ना. हसन मुश्रीफ यांच्याहस्ते शाखेचा गौरव करण्यात आला.
बँकेच्या भेडसगाव शाखेने सन २०२३ २४ या आर्थिक वर्षात १६५ टक्के ठेवींचे संकलन केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात १०१ टक्के ठेवींचे संकलन झाले होते. गेल्यावर्षपिक्षा यावर्षी या शाखेतील ठेवीमध्ये सुमारे ६४ टक्के वाढ झाली आहे. तसेच ठेवी संकलनामध्ये मलकापूर शाखेने तालुक्यात दुसरा क्रंमाक मिळवला आहे. भेडसगाव, मलकापूरसह १०० टक्के उदिष्ट पूर्ण केल्याबदल तालुक्यातील करंजफेण, नांदगाव, सरूड या शाखांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड, बँकेचे शाहूवाडी तालुका विभागीय अधिकारी ए. के. सातपुते, सर्व शाखा निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व शाखेतील कर्मच्ह्मयांनी ठेवी संकलनाचे हे उदिष्ट पुर्ण केले आहे.
फोटो ओळी-भेडसगाव : शाखाधिकारी उदय कोकणे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करताना ना. हसन मुश्रीफ सोबत बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील – आसुर्लेकर, विजयसिंह माने, भैय्या माने आदी मान्यवर.










