March 24, 2026

द्वारकानाथ भोसले यांच्या आर्ट अँन्ड क्राफ्ट प्रशिक्षणाने शिबिरार्थी आनंदित

0
IMG-20240612-WA0019(1)

द्वारकानाथ भोसले यांच्या आर्ट अँन्ड क्राफ्ट प्रशिक्षणाने शिबिरार्थी आनंदित

अमरावती येथे दिली कौशल्यपूर्ण ज्ञानाची मेजवानी

कोल्हापूर/प्रतिनिधी

श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम अमरावती येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित श्री गुरुदेव सुसंस्कार व छंद शिबिराचे आयोजन ५ ते १५ जून पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना सेवा शिस्त ,स्वावलंब , मलखांब चित्रकला व वक्तृत्व कला या सोबतच अनेक विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. या शिबिरात हेरले ता.हातकणंगले जि. कोल्हापूर येथील उपक्रमशील शिक्षक द्वारकानाथ भोसले यांनी शिबिरार्थी ना आर्ट,क्राफ्ट,एरोबिक्स चे प्रशिक्षण देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत तर केलाच पण कौशल्यातून कारक कौशल्याचे ज्ञान देत सध्याच्या स्पर्धेच्या युगात आव्हानाशी सामना करणारे मूलभूत ज्ञान देऊन प्रशिक्षित केले.

८जून रोजी द्वारकानाथ भोसले यांनी शिबिरार्थ्यांना आर्ट अँन्ड क्राफ्ट कले अंतर्गत विविध कला कौशल्य शिकवले. या मध्ये क्राफ्ट पेपर पासून फुल तयार करणे, कागदांच्या पासून टोप्या तयार करणे, विविध मुखवटे तयार , बॉक्स तयार करणे इत्यादी अनेक प्रकार त्यांनी अत्यंत कुशलतेने शिबिरार्थींना सांगितले. त्याचबरोबर सुंदर व वळणदार हस्तक्षरांची तासिका सुद्धा महत्वपूर्ण ठरली. पंधरा मिनिटात सरांनी सांगितलेल्या व शिकविलेल्या पद्धतीने प्रत्येकाच्या हस्तक्षेत्रात जलद गतीने ५०% टक्केहुन अधिक फरक जाणवला. भोसले सरांची शिकवण्याची साधी सोपी पद्धत , जिज्ञासा उत्साह ,आकलन करून देण्याची शैली यामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक ठरले. यामुळे प्रशिक्षणार्थी भारावून गेले .

या प्रशिक्षणाकरिता शिबिर संयोजक अमोल बांबल यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच शिबिराचे सहयोगी सहकारी सागर भालचंद्र ,अनुराग बागुलकर, प्रेम पडघन ,हेमंत साबळे, गौरीशंकर किन्हाके, प्रशांत पाचगरे , विशाल गहुकर, अक्षय धानोकर , तृप्ती डेहाणकर , सरिता बांबर , प्राजक्ता ठाकरे ,श्रीमती रूपाली निर्मळ , रंजना राठोड इत्यादींनी सहकार्य केले.

शेवटी द्वारकानाथ भोसले यांच्या प्रशिक्षणाचा या आनंददायी उपक्रमांनी हसत खेळत समारोप करण्यात आला.
संयोजन समितीच्या वतीने योग्य आदरातिथ्य करत स्मृतीचिन्ह देऊन द्वारकानाथ भोसले यांचे ऋण व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!