प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर/प्रतिनिधी
आज शाळेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना प्रलंबित प्रश्नांच्या मागण्यांचे निवेदन शासनाला पाठवण्याबाबत विनंती केली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन शासनाला पाठवू असे सांगितले.
निवेदनात १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जुलमी शासन निर्णय,ड्रेस कोड विद्यार्थी व शिक्षक हा अनैसर्गिक शासन,नवभारत साक्षरता अभियान सारखे अभियान राबवून मुलांच्या पासून शिक्षकांना दूर ठेवने, ऑनलाईन कामाचा ससेमीरा लावण्याला विरोध.कोल्हापूर जिल्ह्याने कुमार कन्या एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला विरोध.गोरगरिबांचे शिक्षण संपवण्यासाठी समूह शाळा करण्याचा घाट शासनाने घातला आहे.संच मान्यतेचा शासन निर्णय हा सर्वांसाठी घातक असून ग्रामीण शिक्षणावर घाला घालणारा आहे हे सर्वांनाच ज्ञात आहेच.
वास्तविकपणे संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांची भौगोलिक स्थिती वेगळी असताना एकच ड्रेस कोड शिक्षकांना शक्य आहे का?त्याच प्रमाणे विद्यार्थी गणवेशाचा सुद्धा घोळात घोळ आहे. एवढेच काय तर नवभारत साक्षरतेचा प्रश्न याही वर्षी सुद्धां आवासून आहेच.
ऑन लाईन कामाने शिक्षक मुख्याध्यापक त्रस्त आहे. त्याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समूह शाळा निर्माण करण्याचा आणि गोरगरिबांचे शिक्षण संपवण्याचा कुटिल डाव शासनाने केला आहे. खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा हा डोंगराळ जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि असे असताना सुद्धा गोरगरिबांचे शिक्षण होऊ न देता त्यां लेकरांना फक्त खळ लावायलाच निर्माण करायचं असं शासनकर्त्यांच्या मनात आहे की काय अशी शंका आहे, नित्य नवनवीन इतरही ज्वलंत समस्या आ वासून उभ्या आहेतच.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, शिक्षक नेते जोतिराम पाटील,पुणे विभाग अध्यक्ष अर्जुन पाटील, सुधाकर सावंत, बँक चेअरमन राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर, राज्य प्रसिद्धीप्रमुख हरिदास वर्णे, कार्याध्यक्ष गणपतराव मांडवकर, डी जी पाटील,सचिन कोल्हापुरे, तुकाराम मातले, संजय देवाण्णा, अरविंद शेळके, प्रमोद भांदीगरे, शाहू चौगुले, सिद्धार्थ पाटील, शरद केनवडे,युवराज काटकर,बाजीराव पाटील,राजीव परीट उपस्थित होते.
(फोटो ओळ:-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष
प्रमोद तौंदकर,प्रभाकर कमळकर, सुधाकर सावंत,शाहू चौगले,हरिदास वर्णे.)










