करवीर शिक्षक पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी अजित खाडे, संतोष गायकवाड,संगीता अलगौडर
करवीर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी अजित खाडे, संतोष गायकवाड,संगीता अलगौडर
कोल्हापूर/मारुती फाळके
करवीर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी शिक्षक समितीचे अजित खाडे, जुनी पेंशन संघटनेचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड व करवीर जुनी पेंशन संघटनेच्या महिला कार्याध्यक्षा संगीता अलगौडर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठी जिल्हा नेते कृष्णात कारंडे , शिक्षक बँक संचालक सुरेश कोळी, शिक्षक बँक संचालिका वर्षा केनवडे,शरद केनवडे,संस्थेच्या चेअरमन दिपाली भोईटे, व्हा. चेअरमन शशिकांत धुत्रे सर्व संचालक, सुकाणू व सल्लागार समिती यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील, सुकुमार मानकर,धनाजी सासणे, संदीप मगदूम,यशवंत चौगले,धनाजी पाटील,राजेंद्र तौंदकर,दीपक पाटील,प्रताप पाटील,बाळासाहेब कांबळे, सचिन पावसकर, तसेच हरिदास वरने, बाबा धुमाळ,पंडित पाटील, गजानन मोरे, दत्तात्रय सुतार,जुनी पेंशन संघटनेचे मारुती फाळके,बाबुराव निकम,
आनंदा बनकर,दत्तात्रय शिंदे,स्नेहा माळी,सादिया मुजावर,जैनब शेख,पल्लवी सारंग,अमर पाटील,सचिन पावसकर,शिवतेज बाजारी,प्रशांत देवरुखकर,सचिन सुतार,गोरखनाथ पाटील,मुरलीधर कुंभार,नितीन कांबळे ,संस्थेचे सचिव संदीप शिंदे,प्रसनजीत कारंडे,ओंकार वातकर आदी उपस्थित होते.
(फोटो ओळी- करवीर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी अजित खाडे, संतोष गायकवाड व संगीता दिवटे -अलगौडर यांची तज्ञ संचालकपदी निवडीबद्दल सत्कार करताना कृष्णात कारंडे, सुरेश कोळी, दिपाली भोईटे,शशिकांत धुत्रे,चंद्रकांत पाटील, धनाजी पाटील,सुकुमार मानकर आदी.)










