March 24, 2026

मैत्री दिनानिमित्त दोस्ती फाउंडेशन मार्फत विद्यामंदिर टोप मध्ये वृक्षारोपण

0
IMG-20240804-WA0061

मैत्री दिनानिमित्त दोस्ती फाउंडेशन मार्फत विद्यामंदिर टोप मध्ये वृक्षारोपण

कोल्हापूर/मारुती फाळके

अगदी लहानपणापासून एकत्र असणारे साधारणपणे 30 वर्षापासून एकमेकांशी खेळत मोठे झालेले मित्र आजही त्याच आनंदात एकत्र आहेत. एकमेकांचा वाढदिवस करणे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, असे सख्ख्या भावांप्रमाणे एकत्रित राहणारी ही सर्व मंडळी….

या दोस्तीच्या माध्यमातूनच सामाजिक काम करण्यासाठी दोस्ती फाउंडेशन ची स्थापना केली. त्या अनुषंगाने आज ४ ऑगस्ट  रोजी दोस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यामंदिर टोप या ठिकाणी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली.
सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खड्डे काढण्यापासून, माती गोळा करणे, झाडांची निवड करणे, झाडे आणणे लावणे, खत घालणे व त्यांना आळी करणे अशी वेगवेगळी कामे ह्या मित्रांनी एकजुटीने केली.

    आजचा मैत्री दिन अतिशय उत्साहात आनंदात एक सामाजिक उपक्रम पूर्ण करत तब्बल ३८ झाडे लावत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.यामध्ये वनस्पती अशोक १२,Crystiyana २३,कडुनिंब २ व 
पिंपळ १ या प्रकारची झाडे लावली.

सलाम  या ३० वर्षापासूनच्या मैत्रीला आणि सलाम त्यांच्या या मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्याच्या सामाजिक उपक्रमाला!

यामध्ये टोप गावातील  रवींद्र मिसाळ, बालाजी पांढरे , संदीप पाटील, सचिन गायकवाड, दीपक पाटील, योगेश देसाई, अमित पाटील, नवदीप घोरपडे,अमोल पाटील, विश्वजीत लोहार, नेताजी पाटील, अजित पाटील, संतोष गायकवाड, सागर एस पाटील, अभिषेक ढवाळे, अमर पाटील, अमोल कदम, योगेश सुतार, सागर टी पाटील, सुनील कोपर्डे, प्रदीप गोंधळी, प्रकाश मुळीक व फाउंडेशनच्या एकमेव महिला सदस्य सौ. अमृता धनवडे या सर्वांनी उपक्रमाच्या परिपूर्तीसाठी विशेष कष्ट घेतले व सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!