March 24, 2026

शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई- राजाराम वरुटे

0
IMG-20240916-WA0061

शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई- राजाराम वरुटे

शिक्षकांच्या प्रश्नाबाबत महामंडळ सभा संपन्न

कोल्हापूर/मारुती फाळके

राज्य शासनाने शिक्षक संचमान्यतेबाबत १५ मार्च रोजी काढलेला आदेश व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा ५ सप्टेंबर रोजी काढलेला आदेश दुर्गम भागातील वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे.,शासनाच्या या तुघलकी धोरणाना विरोध तसेच शिक्षकांच्या या न्याय्य मागण्यासाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई करू असे प्रतिपादन शिक्षक संघ शि.द.पाटील गटाचे राज्य सल्लागार माजी राजाध्यक्ष राजाराम वरुटे यांनी केले ते कोल्हापूर येथील जि. प.कर्मचारी सोसायटी सभागृहात संघटनेच्या वतीने महामंडळ सभेत बोलत होते.

हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत. या मागणीसाठी बुधवार, दि. २५ रोजी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी संघटनेच्या शिलेदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजाराम वरुटे यांनी केले.

वरुटे म्हणाले,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असून या कोर्ट मॅटर ची स्थगिती उठली असून येत्या बुधवारी किंवा गुरूवारी केंद्रप्रमुखांच्या पदोन्नती होतील.ग्रेड ३ च्या विस्थापित पदांना डीएड,बीएड ची अट नाही. शासनाच्या अन्यायकारक धोरणांना शिक्षक संघ सातत्याने विरोध करीत आला आहे. शिक्षकांची मेडिकल बिले काढण्यासाठी तसेच आंतरजिल्हा बदली, नवनियुक्त शिक्षकांना शाळा मिळवून देण्यासाठी नेहमीच शिक्षक संघाने सकारात्मक भूमिका घेतली आहे.शिक्षकांच्यावर सातत्याने अन्यायकारक शासन निर्णय लादुन बहुजन समाजाचे शिक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न शासन पातळीवर सातत्याने सुरू असून हा प्रकार संघटना कदापि खपवून घेणार नाही या विरोधात राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. २५ तारखेला काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी या आंदोलनामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे.
आज गणपती सारखी सुट्टी, विज्ञान प्रमोशन,पगारासाठी सातत्याने पाठपुरावा यासारखे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळवण्यासाठी आयुक्त पातळीवर संघटना बदलीसाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
तसेच विषय शिक्षकांचे रिव्हर्शन- प्रमोशन याबाबत ही संघटनेने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठा सर्वेक्षणाचे मानधन लवकरात लवकर मिळण्यासाठी तसेच शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे रद्द होण्यासाठी संघटनेचा सातत्याने पाठपुरावा आहे.साक्षरता कार्यक्रमावर बहिष्कार असून त्यातील शैक्षणिक कामे करण्यासाठी शासनाचा आग्रह आहे. सर्व संघटना समनव्य समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शिक्षकांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावी असेही ते म्हणाले.१५ मार्च व ५ सप्टेंबर च्या शासनाने काढलेल्या अन्यायकारक दोन्ही निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील १ शिक्षक कमी होऊन सुमारे २ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे शासनाने हे आदेश तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही यावेळी वरुटे यांनी केली.

राजाराम वरुटे म्हणाले की, शिक्षक संघ ही राज्यातील बलाढ्य शिक्षक संघटना असून संघाच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले जात आहेत. शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया, चटोपाध्याय प्रस्ताव मंजुरी, हिंदी मराठी भाषा सूट आदेश, मुख्याध्यापक प्रमोशन , विस्तार अधिकारी प्रमोशन, मेडिकल बिल मंजुरी, बहीस्थ परीक्षा परवानगी आदेश मंजुरी , फंडाची बिले,
वेतन अपडेट्स आदी प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून ते तडीस नेले आहेत. त्यामुळे संघावर जिल्ह्यातील शिक्षकांचा विश्वास वाढत चालला.त्यामुळे  संघाची ताकद वाढली आहे.

राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले की, राज्य स्तरावरील प्रश्न शिक्षक संघाच्या माध्यमातून सोडवले जात असून येत्या २५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्च्यात जिल्ह्यातील सर्वच शिक्षक बंधू आणि भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होवून शिक्षक एकजुटीची ताकद दाखवावी.यावेळी त्यांनी राज्य कार्यकारिणीच्या कामाची माहिती दिली.

यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांनी आपापल्या तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न मांडले.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर, सुकाणू समिती सदस्य राजू जुगळे , सर्जेराव सुतार यांची भाषणे झाली

महामंडळ सभेत विविध विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले . यामध्ये विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख पदोन्नती,विषय शिक्षक / पदवीधर प्रमोशन,अपूरे गणवेश,
अशैक्षणिक ऑनलाईन कामे, लिंक भरणे,संच मान्यता जी. आर. , २० पटाच्या आतील शाळांबाबत,उर्वरीत तालुका अधिवेशन, अतिरिक्त शिक्षक समायोजन, २०२३ चटोपाध्याय,तालुका/ जिल्हा स्तरावरील प्रलंबीत कामांबाबतची माहिती तसेच आयत्या वेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

सभेत नूतन पतसंस्था चेअरमन, तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष तसेच जि.प. कर्मचारी सोसायटी चे संचालक श्रीकांत चव्हाण,तज्ञ संचालक बाबा साळोखे,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन प्रशांत पोतदार सर, बाजीराव कांबळे, जी एस पाटील ,साहेब शेख,बाबा साळोखे, रवींद्र नागटिळे, पांडुरंग केणे, बबन केकरे,बी.एस. पाटील,श्रीपती तेली,नामदेव रेपे, शिवाजी पाटील, वसंत जाधव, संदीप पाडळकर, राजेंद्र पाटील, किरण दिवटे, सातापा चौगुले, मारुती दिंडे,विजयकुमार केंद्रे, डी एस पाटील,संजय ठाणेकर, डी डी कडवं,भिवाजी लोखंडे, अनिल कंगणे, विजय मालधारी, स्मिता डिग्रजे, लता नाईकवडे आदींसह शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट-

समुपदेशन बदलीसाठी प्रशासनाचे आभार!

कोल्हापूर जिल्हा परिषदेने राज्यात ऐतिहासिक समुपदेशन बदल्या करून शिक्षकांना सोयीच्या शाळा मिळवून दिल्या. या जिल्हा परिषदेच्या इतिहासातील अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या ऐतिहासिक बदल्या आहेत. या बदल्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आणि सर्व अधिकारी वर्ग,प्रशासनाचे आभार मानले. राज्यात पारदर्शी आणि अतिशय शिस्तबद्ध बदल्या केल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग यामुळे राज्यभर लौकिकार्थाने चर्चेत आला असेही ते म्हणाले.

स्वागत सरचिटणीस डी.पी. पाटील,प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बी एस पाटील, सूत्रसंचालन सर्जेराव सुतार तर आभार बी. एल. शिंदे यांनी मानले.

फोटो ओळी-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने महामंडळ सभेत उपस्थितांना संबोधित करताना शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे, सोबत व्यासपीठावर राजू जुगळे, पांडुरंग केणे, बी एस पाटील, रवींद्र नागटिळे,संभाजी बापट, नामदेव रेपे, डी.पी.पाटील, श्वेता खांडेकर, सर्जेराव सुतार,संदीप पाडळकर आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!