विद्या मंदिर बहिरेवाडी ,ता पन्हाळा शाळेची वारणा विज्ञान केंद्राला भेट.
कोल्हापूर/प्रतिनिधी
शनिवार दि. २१ रोजी विद्यामंदिर बहिरेवाडी ता पन्हाळा या शाळेतील विद्यार्थ्यांनी वारणा विज्ञान केंद्राला भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुंभार यांच्या प्रशासनाखाली शाळेचे विज्ञान विषय शिक्षक विश्वनाथ बोराटे सर व संगीता कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ च्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांचा विज्ञान विषयक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा या भावनेने वारणा विज्ञान केंद्राला भेट दिली.
या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे इंटर ऍक्टिव्ह प्रदर्शने पाहिलीत व अनेक मनोरंजनात्मक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये विज्ञानाचा आनंद घेतला. त्याच बरोबर वारणा विज्ञान केंद्राच्या जवळ असणारा मुलांसाठी खेळण्याचा प्ले एरिया यातही खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच विज्ञान व विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवण्याचा योग या ठिकाणी सर्व मुलांना आला.
अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल आणि मुलांच्या सर्वांगीण विकास होईल.
विद्या मंदिर बहिरेवाडी या शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विद्यार्थी, पालक ,समाज या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










