March 24, 2026

विज्ञानाची दृष्टी माणसाला अजून आली नाही – ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे

0
IMG-20241006-WA0004

विज्ञानाची दृष्टी माणसाला अजून आली नाही – ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे
     तिसंगी महाविद्यालयात लोकनेते म.ह. शिंदे स्मृतिदिन सोहळा

कोल्हापूर/प्रतिनिधी

पृथ्वी तलावावर विज्ञान आलं पण पण विज्ञानाची दृष्टी माणसाला अजून आली नाही ‘ असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांनी व्यक्त केले.ते तिसंगी (ता. गगनबावडा) येथील म.ह. शिंदे महाविद्यालयात महादेव हरी शिंदे यांच्या २९व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी.जी. शिंदे होते .

यावेळी बोलताना श्रीराम पचिंद्र म्हणाले, ” आपल्याला कोणताही सिद्धांत शोधायची गरज नाही कारण आपल्या भारतीय मातीतच सिद्धांत रुजलेले आहेत. माणसाचा हस्तक्षेप ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण आपण फक्त प्रगतीच्या गप्पा मारत आहोत असे चित्र आज सगळीकडे दिसते”

     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पी.जी. शिंदे म्हणाले, ” ज्या राष्ट्राला भूतकाळाचा विसर पडला ते राष्ट्र भविष्यकाळात कोणतीही नवनिर्मिती करू शकणार नाही. या नवनिर्मितीसाठी सृजनात्मक पावले असणारी आपली तरुणाई आहे. त्यांच्याकडून फक्त अशाच व्यक्त करायच्या नाहीत तर त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे “.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते म. ह.शिंदे यांच्या स्मृतीचे प्रतिमा पूजन झाले. यावेळी विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. *मॅरेथॉन मुले : प्रथम क्रमांक प्रधान किरुळकर,
द्वितीय क्रमांक : धनाजी घुरके, तृतीय क्रमांक – सुहास रायकर,उत्तेजनार्थ- शुभम किरुळकर
*मुली : प्रथम क्रमांकसुजाता पाटील,
द्वितीय क्रमांक-सानिका गुरव, तृतीय क्रमांक: प्राजक्ता शेलार,उत्तेजनार्थ – दीक्षा पाटील आणि *वक्तृत्व स्पर्धा : प्रथम क्रमांक -संकेत पाटील, द्वितीय क्रमांक – नयना कुपले, तृतीय क्रमांक- वेदांती कुपले, उत्तेजनार्थ क्रमांक – सुप्रिया सूर्यवंशी
या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आजीवन अध्ययन व विस्तार कार्य शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने विविध कोर्स राबविले गेलेत त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे, खजानिस बंडोपंत पाटील,संचालक आनंदा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य नंदकुमार पवार,संकेत शिंदे, केरबा देसाई, माध्यमिक विद्यालय शेळोशीचे मुख्याध्यापक वाय. ए.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉ. आर.एस.पोंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.विनोद कांबळे यांनी करून दिला. आभार डॉ. शिल्पा शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.एस.ए.मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, गगनबावडा तालुक्यातील विविध भागातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(फोटो ओळी-तिसंगी येथील म.ह. शिंदे महाविद्यालयात महादेव हरी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलताना ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे, मंचावरती संस्थाध्यक्ष पी.जी. शिंदे, सचिव स्वप्नील शिंदे, खजानिस बंडोपंत पाटील, संचालक आनंदा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे,नंदकुमार पवार, प्राचार्य डॉ.आर. एस.पोंदे आदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!