March 24, 2026

दशरथ कुंभार यांना ‘केओपी माझाचा’ राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार

0
IMG-20241006-WA0055

दशरथ कुंभार यांना ‘केओपी माझाचा’ राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षक आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते वितरण

कोल्हापूर/मारुती फाळके

दि न्यू एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या न्यू हायस्कूल मराठी शाखेचे उपक्रमशील,गुणी शिक्षक दशरथ जगन्नाथ कुंभार यांना यावर्षीचा ‘केओपी माझा’ या न्यूज चॅनलच्या वतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक’गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे, गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार,वेतन पथकाच्या अधीक्षक वसुंधरा कदम पाटील,संपादक राजेंद्र कोरे,विनानुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे तसेच कृष्णा हिरेमठ, एम. डी. पाटील,उमेश देसाई,विलास पिंगळे या मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दशरथ कुंभार हे दि.न्यू एज्युकेशन शिक्षण सोसायटीच्या न्यू हायस्कूल मराठी शाखेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर शिष्यवृत्ती, नवोदय, इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थी चमकवले आहेत. क्रीडा- सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. गतवर्षी आणि यावर्षी झालेल्या भारत सरकारच्या ‘उल्हास मेला’ मध्ये गायन- अभिनय या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत अंगभूत कलेची छाप उमटवली आहे. सतत शाळा,समाज, विद्यार्थी यांच्या प्रगतीचा ध्यास घेतलेले दशरथ कुंभार यांचा अप्रगत विद्यार्थी कौशल्यपूर्ण प्रगत करण्यामध्ये हातखंडा आहे.विद्यार्थ्यांच्यातील मूलभूत क्षमता विकासनाबरोबर विद्यार्थ्यातील कारक कौशल्याचा विकास करण्यामध्ये दशरथ कुंभार यांची एक शिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य असण्याची ओळख आहे. या कार्याची दखल घेऊन केओपी माझाचे संपादक राजेंद्र कोरे व निवड समीतीने कुंभार यांची पुरस्कारासाठी निवड केली.
या कार्यात कुंभार यांच्या दि न्यु एज्युकेशन शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी माजी प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, जॉईंट सेक्रेटरी प्राचार्य एस एस चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक  शशिकांत तांदळे,संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी ,प्रशासनातील अधिकारी,शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, कुटुंबीय, मित्रपरिवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळी प्रभाकर लोखंडे,सचिन मरळीकर,नितीन पानारी,संतोष पाटील, नामदेव कुंभार, शोभा कुंभार,नीलम कुंभार,अमित कुंभार,वैभव कुंभार,अभिमन्यू कुंभार,अथर्व कुंभार,स्वराज कुंभार, अरूंधती कुंभार,अद्वैत कुंभार उपस्थित होते.

(फोटो ओळी- राजर्षी शाहू राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार  विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे, गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार,वेतन पथकाच्या अधीक्षक वसुंधरा कदम पाटील,संपादक राजेंद्र कोरे,विनानुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे तसेच कृष्णा हिरेमठ, एम. डी. पाटील,उमेश देसाई,विलास पिंगळे या मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना दशरथ कुंभार,नीलम कुंभार व कुटुंबीय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!