March 24, 2026
IMG-20241006-WA0100

महायुतीचे शासनच टप्पा अनुदान देईल -आमदार उमाताई खापरे

‘केओपी’ माझा च्या पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर/मारुती फाळके

टप्पा अनुदानाचा प्रश्न महायुतीचे शासनच मार्गी लावेल.यापूर्वी शिक्षकांच्या हिताचे अनेक निर्णय भाजपा सरकारने घेतले होते. विनाअनुदानित शाळांचे टप्पा अनुदान देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी केले त्या कोल्हापूर येथे ‘केओपी’ माझा न्युज चॅनेल च्या वतीने ‘समाजभान व आदर्श शिक्षक पुरस्कार’ समारंभात बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, शिक्षण व्यवस्थेत काम करणारा प्रत्येक शिक्षक हा पुरस्कारला पात्र आहे. शिक्षकांमुळेच समाजामध्ये परिवर्तनाचे कार्य घडू शकते याची मला पुरेपूर जाणीव आहे. समाज आणखी ऊर्जेने काम करण्यासाठी पुरस्कार ऊर्जा देत असतात.’केओपी माझा’ चे पुरस्कार म्हणजे उल्लेखनीय कार्य केलेल्या अनेक गुणीजणांच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आणि ऊर्जा आहे. आजवर कर्मचाऱ्याला पुरस्कार देतात हे पहिले होते पण एखाद्या अधिकाऱ्याला पुरस्कार देणे हे या कार्यक्रमात आल्यानंतर समजल्यानंतर अधिकारी सुद्धा आदर्शवत काम करत असतात. शिक्षक वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने मी कार्यरत राहीन, विधानसभेत सातत्याने शिक्षकांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी मी अग्रभागी असते.मला शिक्षकांनी लेखी स्वरूपात प्रश्न द्यावेत. येणाऱ्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून मी हे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करून शिक्षकांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असेन असे त्यांनी आश्वासन दिले.शेवटी शिक्षकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटावेत यासाठी त्यांनी मनोमन इच्छा व्यक्त केली.

गटशिक्षणाधिकारी डॉ.विश्वास सुतार म्हणाले, संवेदनशीलता जागृत करण्याचे काम समाजभान करते. ‘समाजभान’ ही चळवळ उभा करायला लावणे हे आजच्या समाजाचे दुर्दैव आहे. प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये प्रेम ही भावना आहे, पण माणसाच्यात प्रेम ही भावना कुठेतरी कमी होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. ‘केओपी पुरस्कारार्थी’हे समाजाचे दिशादर्शक आहेत. समाजामध्ये जेव्हा जेव्हा विघातक गोष्टी घडतील तेव्हा तेव्हा पुरस्काराने समाजामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील. प्रेम आणि वस्तू यामध्ये माणसाने केलेली गल्लत यामुळे माणसं कुठेतरी माणूसपणापासून लांब चालली आहेत.माणसं वस्तूवर प्रेम करतात पण माणसावर प्रेम करत नाहीत, म्हणून शिक्षण क्षेत्राचे संस्कार आणि संस्कृती रुजवण्याचे प्रभावी काम’पुरस्काराने होईल’ हे कालातीत सत्य आहे. समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याबद्दल त्यांनी केओपी माझाचे संपादक राजेंद्र कोरे व त्यांच्या टीमचे कौतुक केले.

यावेळी वसुंधरा कदम- पाटील खंडेराव जगदाळे,उमेश देसाई, कृष्णा हिरेमठ यांची भाषणे झाली.

चौकट-

पुरस्कार प्राप्त गुणीजन-

कार्यक्रमात शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार, दै. पुढारीचे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण मस्के यांना समाजभान पुरस्कार तर अशोक जोग,शिवाजी कुरणे,रामराजे सुतार,नंदकुमार पाटील,ज्योत्स्ना पवार,अस्मिता पाटील,संभाजी चौगुले, वनिता शिर्के,मेघा गुजर,सुलोचना बागडी, सुरेश जाधव,यास्मिन पेटकर, सागर पाटील,विमल मोरमारे, विश्वजित माणिकशेट्टी, जाहेर शेख,अनुराधा सुतार,माधव पासारडेकर, दशरथ कुंभार,रुपाली पवार,सचिन चौगुले, मयुरी साळवी,आनंदा विठ्ठल, किरण रणसिंग, स्नेहा कांबळे, हनिफ नाकाडे, राहुल टेकाळे, उत्तम कुंभार, निर्मला जाधव,समिना नालबंद, मनीषा गुरव,सरदार पाटील, तानाजी दराडे, जयश्री पुजारी,मीनाक्षी लोखंडे, संजय कदम,अशोक जोग, नेहा गुजर यांच्यासह चाळीस गुणीजनांना राज्यस्तरीय राजर्षी शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केओपी माझाचे संपादक शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी केले.
सूत्रसंचालन राज मेंगे,स्वागत प्रभाकर लोखंडे तर आभार संतोष पाटील यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रभाकर लोखंडे, उपसंपादक,
सचिन मरळीकर, जिल्हा प्रतिनिधी
नितिन पानारी, गणेश बांगर, रविंद्र नाईक, संतोष पाटील. धीरज पारधी राजू अंकली आणि
शिक्षक महासंघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!