पट्टणकोडोली केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी भूपाल मंडगे
पट्टणकोडोली केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी भूपाल मंडगे
कोल्हापूर/मारुती फाळके
जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पदोन्नती प्रक्रियेतून केंद्रशाळा पट्टणकोडोलीचे मुख्याध्यापक भूपाल निळकंठ मंडगे यांची पदोन्नतीने पट्टणकडोली केंद्राच्या केंद्रप्रमुख पदी निवड झाली.
शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय क्र.पीआरई १०९४/७०४/प्रशि -१दि.१४/११/१९९४ अन्वये कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ६८ केंद्रासाठी केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या राजश्री शाहू सभागृहात पार पडली. यामध्ये केंद्र मुख्याध्यापक भूपाल मंडगे यांची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने केंद्रप्रमुखपदी निवड झाली. सेवाजेष्ठतेनुसार ६८ पात्र उमेदवारांना केंद्रप्रमुखपदी बढती देण्यात आली.यावेळी केंद्रशाळेच्या वतीने मंडगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रशाळा पट्टणकोडोलीच्या वतीने केंद्र समन्वयक राजेश पाटील,गणेशवाडी शाळेचे मुख्याध्यापक धनाजी शेवाळे,सुरेश कोळी,केंद्रशाळेतील सहकारी मिनाज मुजावर,दीपाली कोळी, संगीता कोळी, चंद्रभागा देशमुख, मारुती फाळके, प्रकाश कांबळे, विकास माळगे यांच्या हस्ते मंडगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना केंद्रप्रमुख भूपाल मंडगे म्हणाले,केंद्रातील सर्व शाळांत समनव्यय ठेवून कामकाज केले जाईल.केंद्र पट्टणकोडोली जिल्ह्यात आदर्शवत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. प्रशासकीय कामात सहकार्य करण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे. तसेच प्रशासकीय कामकाज सुयोग्य दिशेने पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे ते म्हणाले.दरम्यान केंद्र पट्टणकोडोली च्या समूह साधन केंद्राच्या कार्यालयात प्रवेश करून पदभार हाती घेतला.मंडगे यांच्या निवडीने सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










