March 24, 2026

ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे -भरत रसाळे

0
IMG-20241008-WA0029(1)

ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे -भरत रसाळे

वित्तमंत्री अजितदादा पवार यांचेकडे मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्वांचा लोकप्रिय व उत्साहाचा दिवाळी सण दिनांक २८ऑक्टोबर पासून सुरू होत आहे . त्यामुळे सर्वांची दिवाळी सुखमय होण्यासाठी माहे ऑक्टोबर २०२४ चे वेतन दिवाळीपूर्वी म्हणजे २५ ऑक्टोबरपर्यंत करावे व संबंधित विभागांना तसे आदेशित करावे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी आज वित्तमंत्री नाम.अजितदादा पवार यांच्याकडे केली . याबाबतचे निवेदन नाम.अजितदादा पवार यांना देणेसाठी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागातील शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगलेयांचे कडे देण्यात आले .यावेळीउपशिक्षणाधिकारी
रविंद्र ठोकळ व लेखाधिकारी घनश्याम पुरेकर हे उपस्थित होते.
 

निवेदन वित्तमंत्री ना अजित दादांचेकडे तात्काळ पाठविणेत येईल असे शिक्षण निरीक्षक रविंद्र चौगले यांनी आश्वासित केले .याबाबतचा मेलही वित्तमंत्री नाम . अजित दादा पवार यांना तसेच वित सचिव यांचेकडे कार्यालयाकड पाठविणेत आला असल्याची माहिती समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!