March 24, 2026

करवीर ता. शिक्षक- शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप

0
IMG-20241021-WA0035(1)

करवीर ता. शिक्षक- शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप

कोल्हापूर/मारुती फाळके

करवीर तालुका शिक्षक- शिक्षकेतर सेवक सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप करण्यात आले. तसेच सभासदांना सात टक्के लाभांश वाटप केले. शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी पदोन्नती मिळालेल्या केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, व्हिडीओ निर्मितीमध्ये यश मिळविलेल्या शिक्षकांचा व विविध संस्थावर चेअरमन व संचालक म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करणेत आला. पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पोतदार यांनी पतसंस्थेच्या पारदर्शी कारभाराविषयी माहिती दिली. यावेळी सर्जेराव सुतार, साताप्पा चौगले, बाळासो चौगले, बाजीराव कांबळे, श्वेता खांडेकर, उत्तम पोकर्णेकर यांची भाषणे झाली.

अध्यक्षीय भाषणात राजाराम वरुटे यांनी पतसंस्था स्थापन करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले यासंबंधीची माहिती दिली. तसेच संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. संघटनेशिवाय पर्याय नाही. सर्वांनी संघटनेच्या पाठीशी रहावे असे आवाहान केले. तसेच नुतन केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांनी चांगले काम करुन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

यावेळी मारुती दिंडे, बंडोपंत संकेश्वरे शिवाजी भोसले, संजय ठाणेकर, संताजी पाटील, सरदार सरनोबत, नवनाथ व्हरकट,यावेळी सुकाणू समितीचे बाजीराव लगारे,शामराव जाधव, शंकर भोई,एस.एन. पाटील, बाजीराव पाटील,राजाराम शिर्के,शब्बीर मुजावर, अशोक संकपाळ,आनंदा बेडेकर,के एल खाडे, बाळासो चौगुले,एस एन पाटील
संचालक दत्तात्रय एकशिंगे, संभाजी पाटील ,बाजीराव पाटील,संतोष कांदळकर, धोंडीराम पाटील,प्रकाश निकम ,विजय मालाधारी,डी.एस. पाटील,ज्योत्स्ना महात्मे, वर्षा सनगर, नूरजहा मुलाणी,तज्ञ संचालक भिवाजी लोखंडे, नामदेव पाटील तसेच शिक्षक संघाचे जिल्हा तालुका कार्यकारिणी नवनाथ व्हरकट, सर्जेराव सुतार,विजयकुमार केंद्रे, आर जी कांबळे, संदीप पाडळकर, संतोष चिमले, ऋषिकेश पांचाळ,भीमराव देशमुख,नसीम मुल्ला,लता नायकवडे, रुपाली पाटील,मनीषा एकशिंगे,अश्विनी परीट,पांडू कुंभार, पंढरी काशीद उपस्थित होते. व्हाइस चेअरमन वर्षा सनगर यांनी आभार मानले.कार्यक्रमास शिक्षक सभासद,संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी-
कोल्हापूर :करवीर तालुका शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या वतीने दीपावली भेट देताना शिक्षक नेते राजाराम वरूटे , मारुती दिंडे,प्रशांत पोतदार,बाजीराव कांबळे, श्रीकांत चव्हाण,सर्जेराव सुतार,श्वेता खांडेकर, वर्षा सनगर, शंकर भोई,बाजीराव लगारे,आनंदा बेडेकर आदी.पांडूरंग कुंभार, पंढरी काशीद उपस्थित होते. व्हाइस चेअरमन वर्षा सनगर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!