March 24, 2026

बौध्द धम्म जगाची पुर्नरचना करू शकतो : सिद्धार्थ शिणगारे

0
IMG-20241021-WA0050

समता, स्वातंत्र्य, मैत्री आणि न्याय या तत्वावर उभा असलेला बौध्द धम्म जगाची पुर्नरचना करू शकतो : सिद्धार्थ शिणगारे,

बौद्ध धम्म विचार,आचरणाने व्यक्तिमत्वाची जडणघडण- अमित मेधावी

अभूतपूर्व प्रतिसादात फुलेवाडी कोल्हापूर येथे चौथी वर्षावास बौद्ध धम्मपरिषद संपन्न

कोल्हापूर/मारुती फाळके:

जगाची पुर्नरचना करणे हा धम्माचा उद्देश आहे. समता, स्वातंत्र्य, मैत्री आणि न्याय या तत्वावर उभा असलेला बौध्द धम्म जगाची पुर्नरचना करू शकतो असा ठाम विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होता असे मत सिध्दार्थ शिणगारे यांनी व्यक्त केले. चौथी वर्षावास धम्मपरिषदमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित धम्म चळवळ आणि बौध्द समाजाची भूमिका या विषयावर धम्मदेसना देतांना ते बोलत होते.

सिद्धार्थ शिंनगारे यांच्या धम्म मार्गदर्शनातील ठळक मुद्दे–
1.जगाची पुनर्रचना करणे बाबासाहेबांच स्वप्न.
2.बौद्धांची प्रगती ही शिक्षण,विज्ञानवादी दृष्टिकोन व बौद्ध तत्त्वज्ञानामुळे.
3.जातमुक्त समाज निर्मिती.
4.सामाजिक काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेबांचे संपूर्ण साहित्य वाचणे ही पूर्व अट.
5.देशाची विकसनशील प्रगती बाबासाहेबांच्या दृष्टिकोनामुळे.

फुलेवाडी येथे चौथी वर्षावास बौद्ध धम्मपरिषद डॉ. विजय काळेबाग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. परिषदेचे उद्‌घाटन माजी शिक्षणाधिकारी महावीर माने यांच्या हस्ते तर ध्वजारोहण तानाजी घरपणकर यांच्या हस्ते करण्यात आले. परिषदेचे स्वागताध्यक्ष संजय कुर्डूकर होते.

आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेचा कालखंड हा बौध्द धम्मात वर्षावास पर्व म्हणून ओळखला जातो. कोल्हापुरातील सामाजिक भान असणाऱ्या काही शिक्षक मंडळीनी एकत्र येऊन या वर्षावास पर्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे कुटुंबस्तरावर महावाचन केले जाते. या ग्रंथ वाचनाची सांगता दरवर्षी बौद्ध धम्म परिषदेच्या आयोजनाने केली जाते. चार सत्रात झालेल्या धम्मपरिषदेमध्ये पहिल्या सत्रात भंतेजी सिरीसारो कर्जत यांनी सर्व उपासक उपासिका आणि धम्म बांधवांना बुद्ध वंदना दिली स्वागताध्यक्ष व ध्वजोरोहक यांनी धम्मपरिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली.

यावेळी धम्म चळवळ आणि बौध्द समाजाची भूमिका मांडतांना सिध्दार्थ शिणगारे यांनी धम्म म्हणजे उत्तम जीवन जगण्याचा मार्ग असून तो आचरणाचा विषय आहे, बौध्द लोकांनी आदर्श पध्दतीने जीवन जगले पाहिजे, त्यांच्या आचरणातून बौध्द धम्म झळकला पाहिजे असे सागून बुध्द विहारे ही चळवळीची केंद्र असली पाहिजेत. धम्माचा प्रचार आणि प्रचाराचे कार्य हे खिश्चन मिशनरी प्रमाणे असले पाहिजे. धम्माचा प्रचारक आणि बाबासाहेबांचा कार्यकर्ता होण्यासाठी बाबासाहेबांचे संपूर्ण साहित्य वाचले पाहिजे,तरच तो खऱ्या अर्थाने कार्यकर्ता व धम्मसेवक ठरू शकतो.

बाँध्दांच्या झालेल्या प्रगतीविषयी बोलतांना ते म्हणाले,पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने कार्यकर्ता व धम्मसेवक ठरू शकतो. आजची बौध्दांची प्रगती ही केवळ आरक्षणामुळे झाली हा समज खोटा असून त्याला अनेक कारणे आहेत. बौध्द समाजाने बाबासाहेबांनी दाखविलेला मार्ग स्वीकारला. जुन्या परंपरा, अंधश्रध्दा, संस्कृती ठोकरली व शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. गाव गाडा सोडून शहरात वाटचाल केली. त्यामुळे बौध्द समाजाची प्रगती झाली आहे. आरक्षण हे त्याला निमित्त आहे. खाजगीकरणामुळे आज आरक्षणच शिल्लक राहिले नसल्याने आरक्षणाची गरजच उरली नसल्याचे शिणगारे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

दरम्यान पुरोगामी चळवळीतील गायक डी एस कौशल व सहकाऱ्यांनी प्रबोधनपर बौद्ध भीमगिते सादर केली.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना डॉ. विजय काळेबाग यांनी वैदिक धर्माच्या वर्ण व जातीयव्यवस्थेच्या जोखडातून मुक्ती मिळवून विज्ञानाच्या वाटेवर जाऊन सुखी जीवनाच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यास दुःख मुक्तीचा आणि शोषण मुक्तीचा मार्ग म्हणून १४ ऑक्टोंबर १९५६ ला बौध्द धम्म दिला असल्याचे सांगितले.

तिसऱ्या सत्रात कोल्हापूरातील युवा धम्म विश्लेषक अमित मेधावी यांनी बौद्ध धम्म आणि मानसिक आला. स्वास्थ्य या विषयावर धम्मदेसना दिली.२२ प्रतिज्ञा अभियान, प्राचार्य भाऊसाहेब काळे, स्वाती काळे, कृष्णात माने आदि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

युवा धम्म विचारवंत,धम्म व्याख्याते अमित मेधावी यांच्या धम्म मार्गदर्शनातील मुद्दे
1.बौद्ध तत्त्वज्ञान मनाचा केंद्रबिंदू.
2.आनंदी जीवन जगण्याची कला व कौशल्य आत्मसात करायला हवीत.
3.कल्याण मित्राची संगत.
4.स्वतःला ओळखन्यासाठी ध्यान साधने शिवाय पर्याय नाही.
5.दुःखमुक्त जीवन जगण्यासाठी बुद्धांचा आर्य अष्टांगिक मार्ग समस्त मानव समाजासाठीचा जाहीरनामा.
6.मानवी जीवन क्षणभंगुर.जेवढे क्षण लाभले आहेत ते मानवी कल्याणासाठी समर्पित करायला हवेत.,असेही मेधावी म्हणाले.

या सत्रात समाजातील यशस्वी,प्रावीन्यप्राप्त विद्यार्थी,मार्गदर्शक व वर्षावास धम्म परिषदेसाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक मुख्य संयोजक विजय कूषाण यांनी केले. सुत्रसंचालन सुत्रसंचालक स्वप्नील पन्हाळकर यांनी केले तर आभार विद्याधर काळे यांनी मानले.

धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा.जे.ए. काळे, विलास कांबळे (बापू) संजय कदम, डॉ. राम वाकरेकर, जयेंद्र लाटने, अशोक साळोखे, गौतम वर्धन, पी.डी. सरदेसाई , गजानन कांबळे, बाबासाहेब कांबळे, संदीप कांबळे आदींचे सहकार्य लाभले. धम्म परिषदेस जिल्ह्यातील मोठ्या संख्येनी धम्म बांधव उपस्थित होते.

(फोटो ओळी-
१.फुलेवाडी येथे संपन्न झालेल्या वर्षावास धम्म परिषदेत पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना धम्म देसनाकार प्रख्यात बौद्ध विचावंत सिद्धार्थ शिनगारे
२.दुसऱ्या सत्रात मार्गदर्शन करताना धम्म देसनाकार विचारवंत, पुरोगामी व्याख्याते अमित मेधावी
३.धम्म परिषदेसाठी जमलेला विराट धम्मसमूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!