May 14, 2026

‘गायक शिक्षक मंचा’ची शनिवारी रंगणार’मंगल गाणी दंगल गाणी’ सांगीतिक मैफल

0
IMG-20241225-WA0023(1)

गायक शिक्षक मंच ची शनिवारी शाहू स्मारक येथे रंगणार “मंगल गाणी दंगल गाणी” सांगीतिक  मैफिल

रसिकांनी संगीत पर्वणी चा आनंद घ्यावा- राजेंद्र कोरे,बाळ डेळेकर,राजेंद्र सूर्यवंशी

कोल्हापूर/मारुती फाळके

सरत्या वर्षाला निरोप देताना शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या गायक शिक्षक मंचाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळ्या गीतांची ” मंगल गाणी दंगल गाणी ” ही संगीत मैफिल शनिवारी सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे रंगणार आहे.

गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना रुंजी घालणाऱ्या सदाबहार मराठी गीतांची मैफिल कराओके ट्रॅकच्या माध्यमातून सादर केले जाणार आहे. सर्वांसाठी प्रवेश खुला असल्याने प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन , गायक शिक्षक मंचाचे एडमिन राजेंद्र कोरे,बाळ डेळेकर व रवींद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
लता मंगेशकर,आशा भोसले, किशोर कुमार, महेंद्र कपूर,जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर,सचिन पिळगांवकर यांनी अजरामर केलेली गीते या कार्यक्रमात, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सादर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!