May 14, 2026

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील पाटील,उपाध्यक्षपदी साताप्पा मगदूम

0
IMG-20250118-WA0066(1)

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिक्षक संघाचे सुनील पाटील-म्हाकवेकर, उपाध्यक्षपदी साताप्पा मगदूम

कोल्हापूर/मारुती फाळके

जिल्ह्यातील जि. प.कर्मचाऱ्यांची प्रमुख आर्थिक शिखर संस्था कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिक्षक संघ थोरात गटाचे सरचिटणीस सुनिल रामचंद्र पाटील व व्हाइस चेअरमनपदी साताप्पा मगदूम यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शनिवारी १८ जानेवारी रोजी दुपारी ही बैठक झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून सहकार विभागातील अधिकारी नितीन माने हे होते. चेअरमनपदासाठी पाटील यांना संचालक रणजित पाटील सूचक व संचालक संजय शिंदे यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाइस चेअरमनपदासाठी मगदूम यांना संचालक बाजीराव पाटील हे सूचक व संचालक जितेंद्र वसगडेकर यांनी अनुमोदन दिले. संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक गरुड झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करण्यासाठी आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबद्ध आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकिकात वाढच होत जाईल.त्यासाठी नियोजनबद्द काम करू. तसेच यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपणे, काटकसरीने करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे असे नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांनी निवडीच्या वेळी सांगितले.

निवडीवेळी संचालक सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रविंद्र जरळी, अजय शिंदे, श्रीकांत चव्हाण, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, नंदिप मोरे, जयकुमार रेळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव. तज्ञ संचालक बाबासो साळोखे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.

संस्थेचे मार्गदर्शक एम.आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, राजीव परीट, राजाराम वरुटे, एम.एम. पाटील, के. आर. किरुळकर, मनोहर भाट, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, रविकुमार पाटील, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदुम, दगडू परीट, उपस्थित होते.


संस्थेच्या आर्थिक वृद्धी व सभासद हितासाठी कटिबद्ध- नूतन चेअरमन सुनील पाटील

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी ही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील प्रमुख आर्थिक शिखर संस्था असून संस्थेने आदर्श कार्यपद्धती व सभासदांभिमुख कारभाराचा वस्तुपाठ निर्माण केला आहे.संस्थेच्या आर्थिक वृद्धी व सभासद हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार असून चेअरमन पदाच्या कार्यकाळात संस्थेच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.सभासद कल्याणाच्या अभिनव योजना राबविण्यावर भर राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!