कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांचा गौरव
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांचा गौरव
कोल्हापूर/प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठातून शिक्षणशास्त्र विषयांमध्ये विद्यावाचस्पती पदवी मिळवल्याबद्दल तसेच कोल्हापूर जिल्ह्याला यु-डायस मध्ये राज्यात अग्रभागी मानांकन मिळवण्यात योगदान दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचा आज जिल्हा परिषद येथे शिक्षणाधिकारी दालनात काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष,शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन जिल्हा सरचिटणीस संजय
कुर्डुकर,जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे – चोकाककर,विजय कुषान,पन्हाळा तालूकाध्यक्ष जी. के. कांबळे यांनी शिक्षणाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर जिल्हयाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थी आधार व्हॅलिडेशनचे काम ९७.८९ टक्के पूर्ण केल्याबद्दल राज्य प्रकल्प संचालिका श्रीमती आर. विमला यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हयाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर व गौरव करण्यात आला. हॉटेल ऑर्कीड, बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेत हा सन्मान करण्यात आला होता.
या सन्मानप्रीत्यर्थ हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी शंकर यादव,शिक्षण विस्तारअधिकारी सुतार साहेब,शिक्षक समितीचे सरचिटणीस प्रभाकर कमळकर उपस्थित होते.
(फोटो ओळी-कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांचा सत्कार करताना गौतम वर्धन, संजय कुर्डुकर,जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे – चोकाककर,विजय कुषान, जी. के. कांबळे आदी.)










