May 14, 2026

विजय कांबळे यांच्या दातृत्वातून हातकणंगले तालुक्यासाठी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका

0
IMG-20250114-WA0056

विजय कांबळे यांच्या दातृत्वातून हातकणंगले तालुक्यासाठी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका

‘कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेचे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बळ- गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले

हातकणंगले/प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे यांच्या दातृत्वातून दिलेला पाचवी शिष्यवृत्ती सरावसंच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन हातकणंगले चे गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले यांनी काढले,ते पंचायत समिती हातकणंगले येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या दातृत्वातून शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका प्रदान समारंभात बोलत होते.

चौगुले म्हणाले,कोल्हापूर जिल्ह्याची शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात वेगळी छाप आहे.या स्पर्धा परिक्षातून च विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व साकारले जाते. यासाठी शिक्षक संघटनांनी असे उपक्रम योजावेत,जेणेकरून गुणवत्ता वाढीला चालना मिळेल.कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा हा उपक्रम समाजाला दिशा देणारा असून त्यांनी या दातृत्वाबद्दल विजय कांबळे व संघटनेच्या विधायक उपक्रमाचे कौतुक केले.

प्रास्ताविकपर भाषणात दाते विजय कांबळे म्हणाले, कास्ट्राईब शिक्षक संघटना सातत्याने विद्यार्थी,शिक्षक, शाळा यांच्या हिताचे उपक्रम राबवत असते. संघटनेने आजवर जात वैधता,प्रॉव्हिडंट फंड पावत्या वाटप,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका, शाळाशाळांना संविधान वाटप असे विविध उपक्रम राबवून वेगळेपण जपले आहे. शाळातील विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यासाठी शिक्षक संघटना सदैव प्रयत्न करीत असते.,याचाच एक भाग म्हणून हा प्रश्नपत्रिका सरावसंच हा उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे.तालुक्यात पहिली सराव चाचणी देण्याचा मान संघटनेने मिळवला आहे.असे ते म्हणाले.
कार्यक्रमास संघटनेचे जिल्हा नेते सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे,शिष्यवृत्ती कोअर कमिटी प्रमुख उदय मोहिते,प्रवीण माने,शिक्षक संघाचे जयवंत पाटील विषयतज्ज्ञ आबाजी कांबळे, पूजा कांबळे,मारुती फाळके, संदीप कोरवी, बालाजी पांढरे, अमोल गायकवाड,समीर नायकवडी, मुजाहिद पटेल,तालुक्यातील शिष्यवृत्ती कोअर कमिटी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. आभार मारुती फाळके यांनी मानले.

चौकट-
“संविधानाचा जागर आणि शिष्यवृत्ती सरावसंच “

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असून या अमृतमहोत्सवी संविधान वर्षानिमित्त संघटनेमार्फत वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळाना संविधान वाटप करण्याचा संघटनेचा उपक्रम सुरू आहे. भारतीय लोकशाहीचा पवित्र ग्रंथ असणाऱ्या भारतीय संविधानाबद्दल समाज मनामध्ये जनजागृती करण्यासाठी संघटनेचे हे विधायक पाऊल आहे.आजवर संघटनेचे हातकणंगले तालुक्यातील शासकीय कार्यालये व ७५ च्या वर शाळांना मोफत संविधान वाटप करण्यात आले असून कास्ट्राईब संघटनेमार्फत जिल्ह्यात सर्व शाळांत या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.तसेच जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिष्यवृत्ती सराव संच देण्यात येणार आहेत.
—— विजय कांबळे
जिल्हा उपाध्यक्ष
कास्ट्राईब शिक्षक संघटना

(फोटो ओळी-
शिष्यवृत्ती सरावसंच हातकणंगलेचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगुले यांच्याकडे सुपूर्द करताना कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हा नेते सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, सोबत उदय मोहिते, प्रवीण माने,मारुती फाळके, बालाजी पांढरे, जयवंत पाटील, दत्तात्रय गायकवाड,विषयतज्ञ आबाजी कांबळे, समीर नायकवडी, मुजाहिद पटेल,संदीप कोरवी,सोबत तालुक्यातील शिष्यवृत्ती कोअर कमिटी पदाधिकारी व सदस्य आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!