May 14, 2026

जुनी पेन्शन संघटनेच्या क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद ‘कणेरी’ केंद्रास

0
IMG-20250112-WA0042

जुनी पेन्शन संघटनेच्या क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद कणेरी केंद्रास!

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना करवीर तालुका शाखेतर्फे “एक दिवस निखळ आनंदाचा” क्रीडा स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेत ३८९ शिक्षकांचा सहभाग

कोल्हापूर /मारुती फाळके

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना शाखा करवीर यांच्या वतीने करवीर तालुक्यात प्रथमच आयोजित केलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धेत करवीर तालुक्यांतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद कणेरी केंद्राने पटकावले.अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिक्षक स्पर्धकांच्या अलोट प्रतिसादात स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेचे हे पहिले वर्ष होते.तब्बल ९ क्रीडाप्रकारात एक दिवसीय या स्पर्धा संपन्न झाल्या. पुरुष,महिला शिक्षकांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला.या क्रीडा महोत्सवात जिल्हा परिषदेच्या करवीर गटाकडील तब्बल ३८९ शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे क्रीडा प्रकारात सहभाग घेतला, यामध्ये १८५ महिलांचा लक्षणीय सहभाग होता. स्पर्धेत शिक्षणसेवक ते सेवनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक गुरुजनांनी खेळाचा आनंद लुटला.

स्पर्धा क्रीडा प्रशाला विद्यानिकेतन शिंगणापूर येथे पार पडल्या. प्रारंभीच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील,विस्ताराधिकारी
आनंदा आकुर्डेकर,विजय ओतारी, प्रकाश आंग्रे, अर्चना पाथरे,रघुनाथ शिंदे,मोहन भोसले,शिक्षक संघटनेचे राजाराम वरुटे,प्रकाश सोहनी, क्रीडाप्रमुख कृष्णात माने,शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन,सुरेश कोळी,वर्षा केनवडे,श्रीकांत वरुटे,कोळी मॅडम,करीम खरडे ,स्पर्धा संयोजक संतोष गायकवाड,आरती पोवार व करवीर जुनी पेंशन परिवार यांच्या उपस्थितीत पार पडले.

पुरुष व महिला गटात कबड्डी, रस्सीखेच, ५० मीटर,१०० मीटर धावणे, चालणे, थाळीफेक,थाळी, गोळा फेक, लिंबू चमचा, संगीतखुर्ची, असे विविध क्रीडाप्रकार या क्रीडा महोत्सवात आयोजित करण्यात आले होते.

स्पर्धेचा निकाल असा-
कबड्डी पुरुष गट

प्रथम -कणेरी केंद्र,
द्वितीय -गडमुडशिंगी केंद्र,
तृतीय -वडकशिवाले केंद्र

कबड्डी( महिला)
प्रथम -कणेरी केंद्र ,
द्वितीय -वाशी केंद्र ,
तृतीय- वडणगे केंद्र

रस्सीखेच ( पुरुष )

प्रथम -कणेरी केंद्र,
द्वितीय- शिरोली
तृतीय -बोलोली

रस्सीखेच (महिला )
प्रथम-कणेरी,
द्वितीय-गांधीनगर,
तृतीय- वाशी

५० प्लस वयोगट महिला

( पन्नास मीटर धावणे)
प्रथम -सुरेखा नलवडे
द्वितीय- विद्या कदम
तृतीय -कमल पाटील

५० प्लस वयोगट महिला
(१०० मीटर चालणे)
प्रथम -सुरेखा नलवडे
द्वितीय -शैलजा रणवरे
तृतीय -पद्मावती काळूगडे

५० मीटर धावणे (महिला सर्वसाधारण गट )

प्रथम- सुनीता टिळक
द्वितीय- नूरजहा पेंढारी
तृतीय-रेणुका शिंदे

१०० मीटर धावणे (सर्वसाधारण महिला)
प्रथम- स्वरश्री मुद्रस
द्वितीय- नुरजहा पेंढारी
तृतीय- रेणुका शिंदे

थाळीफेक (महिला)
प्रथम- सुरेखा नलवडे
द्वितीय -मेघा गुरव
तृतीय- रेणुका शिंदे

गोळा फेक (महिला)
प्रथम- सुरेखा नलवडे
द्वितीय -स्वरश्री मुद्रस
तृतीय -अर्चना पाटील

लिंबू चमचा (महिला)
प्रथम- पुनम पाटील
द्वितीय -नूरजहा पेंढारी
तृतीय -सुमन शिंदे

५० मीटर धावणे
( ५० प्लस पुरुष गट)
प्रथम क्रमांक- पंढरीनाथ पाटील द्वितीय -तानाजी जाधव
तृतीय -शरद केनवडे

१०० मीटर धावणे (पुरुष गट)

प्रथम -अमर पाटील
द्वितीय -पंडित दुर्गुळे
तृतीय -कृष्णा भोसले

१०० मीटर चालणे (पुरुष 50 प्लस वयोगट )
प्रथम- बाबुराव खोत
द्वितीय- मारुती लांबोरे
तृतीय- भगतसिंग कणसे

लांब उडी पुरुष
प्रथम -अमर पाटील
द्वितीय बाबुराव – निकम
तृतीय -महादेव अलंकार

गोळा फेक पुरुष
प्रथम- काशिनाथ कुंभार
द्वितीय-महादेव अलंकार
तृतीय -अमर पाटील

थाळीफेक पुरुष
प्रथम- काशिनाथ कुंभार
द्वितीय-करीमचंद्र खर्डे
तृतीय- रवींद्र जाधव

सर्वोत्तम खेळाडू पुरुष
अमर पाटील

सर्वोत्तम खेळाडू महिला गट

सुरेखा नलवडे

सर्वोत्तम स्पिरीट प्लेयर
सुभाष गावित

चॅम्पियन्स ट्रॉफी-
कणेरी केंद्र

स्पर्धेचे बक्षीस वितरण शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा आकुर्डेकर,शिक्षक नेते कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके, शिवाजी रोडे- पाटील,अमर वरुटे, पद्मजा मेढे, वर्षा केनवडे, ऑलम्पिकवीर अर्जुन पुरस्कार विजेते स्वप्निल कुसाळे यांचे वडील सुरेश कुसाळे, संजय कुर्डुकर,सुरेश कांबळे,जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, बालाजी पांढरे, विश्वनाथ बोराटे, दीपक गायकवाड,संतोष जुगळे, दिलीप वाळवेकर, रमेश मेडेवार, बाजीराव जाधव, प्रकाश सोहनी,सदानंद शिंदे,महादेव शिंदे, बाबा धुमाळ, मनीष कांबळे यशवंत चौगुले, सचिन पावसकर, केंद्रप्रमुख मनीषा सपाटे, एकनाथ यादव, एन डी साळवी, राणेश्वर थोरबोले, संजय गांगण,महेंद्र स्वामी, शंकर पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

चौकट-१

यशस्वी संयोजन टीम

शिक्षक क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, संजय पाटील,आरती पवार, सादिया मुजावर, संगीता दिवटे-अलगोंडर, स्नेहा माळी, बाबुराव निकम, आनंदा बनकर,मारुती फाळके,जैनब शेख, नितीन कांबळे, मिलिंद कांबळे, अरुण टिपूगडे,प्रशांत देवरुखकर,अमर पाटील, सचिन सुतार, दत्ता शिंदे, मुरली कुंभार, चेतन शिंदे, सुनील सुतार,काशीराम बिरूनगी, नंदकुमार गिरीगोसावी,महेंद्र कांबळे, परशुराम देवडकर, राहुल कदम,विलास तोडकर,संतोष चव्हाण,राहुल झिरमिरे,  प्रशांत शिरोलीकर, संतोष चिमले, सुशांत बकरे, राहुल चौगले, प्रमोद पवार,राजरत्न खाडे,नामदेव जाधव, भोलानाथ भोसले, संदीप पाटील,गोरख पाटील, शितल शिंदे,दिपाली कतगर, स्वप्नाली कतगर, संयोगीता महाजन, अनुराधा वळसंगकर, राजश्री संगशेट्टी, रेश्मा पटवेगार,पुनम पाटील, राजश्री पाटील व करवीर जुनी पेन्शन संघटनेच्या सर्वच शिलेदारांनी महत्त्वाचे योगदान दिले.

चौकट-२
नेटक्या नियोजनाचे कौतुक-

नोकरीच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढत आपणही क्रीडा कौशल्याचा आनंद घ्यावा, मन,मेंदू आणि शरीराला ऊर्जा द्यावी.स्व तील कारक कौशल्याचा विकास करावा. “एक दिवस या निखळ आनंदातून आपणही ताजेतवाने व्हावे” या उद्देशातून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा करवीर यांच्यातर्फे या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. खरंतर या स्पर्धा जिल्हा परिषद प्रशासनाने आयोजित करणे क्रमप्राप्त आहे.जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित होतात, परंतु ‘शिक्षक’ केडर ला या स्पर्धेत सहभाग घेता येत नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या या मागणीची दखल घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करावे,अशी गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षक संघटनांची मागणी आहे,परंतु आपणच एक पाऊल पुढे टाकत सर्वच पातळीवर नेटके,शिस्तबद्ध नियोजन करून जुनी पेंशन संघटना शाखा करवीर ने मात्र क्रीडा स्पर्धेच्या संयोजनाचा जिल्ह्याला एक आदर्श घालून दिला,इथून पुढे प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात या स्पर्धांचे नियमितपणे आयोजन करणार असल्याचे संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले.

चौकट-३
कार्यक्रमाचे बहारदार निवेदन..

“गौरवशाली महाराष्ट्राचा ऐतिहासिक वसा आणि वारसा यांचा उल्लेख करत…!””कोल्हापूरच्या तांबड्या मातीतून तयार झालेल्या अनेक खेळाडूपासून ते ऑलिम्पिक पदाला गवसणी घालणार्या स्वप्नील कुसाळे पर्यंतचा प्रवास” सूत्रसंचालक राहुल चौगले सर यांनी आपल्या ओघवत्या शैलित सर्वांसमोर मांडला…उपस्थित सर्वांनीच या प्रभावी सूत्रंचालनाचे कौतुक केले….

स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडा प्रशालेचे क्रीडा शिक्षक,क्रीडा प्रशालेचे विद्यार्थी आदींनी  बहुमोल सहकार्य केले.स्पर्धेचे सूत्रसंचालन राहुल चौगले तर आभार आनंदा बनकर यांनी मानले.

फोटो ओळी-
१.
जुनी पेन्शन संघटना शाखा- करवीर यांच्या वतीने क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलित करताना करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी प्रकाश आंग्रे, अर्चना पाथरे, मोहन भोसले,राजाराम वरुटे, शिक्षक बँकेचे संचालक सुरेश कोळी,गौतम वर्धन, संचालिका वर्षा केनवडे,पद्मजा मेढे,माजी संचालक बाजीराव कांबळे,शरद केनवडे,महेंद्र स्वामी,संतोष गायकवाड,संजय पाटील,आरती पोवार, आदी.

२. विजेतेपदाचे मानकरी कणेरी केंद्रास गौरविताना शिक्षणविस्तार अधिकारी आनंदा आकुर्डेकर, शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके, शिवाजी रोडे- पाटील, अमर वरुटे, वर्षा केनवडे, पद्मजा मेढे, मंगेश धनवडे, बालाजी पांढरे, मारुती फाळके, विश्वनाथ बोराटे, संतोष गायकवाड,आरती पोवार,सोबत जुनी पेंशन संघटना करवीर,व विजेते कणेरी केंद्र आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!