May 14, 2026

शिक्षक संघ शि. द.पाटील गटाच्या वतीने होणार नारी शक्तीचा सन्मान- राजाराम वरुटे

0
IMG-20250308-WA0057

शिक्षक संघ शि. द.पाटील गटाच्या वतीने होणार नारी शक्तीचा सन्मान- राजाराम वरुटे

१० एप्रिल ला ३८ महिला शिक्षकांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविणार- संभाजी बापट

कोल्हापूर/मारुती फाळके

आंतरराष्टीय महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट), कोल्हापूरतर्फे शैक्षणिक कामकाज उत्कृष्टरित्या करणाऱ्या शिक्षिकेंना ‘राजमाता जिजाऊ महिला आदर्श महिला शिक्षक पुरस्कार’ घोषित केले. यंदा ३८ महिला शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. यासंबंधीची घोषणा शिक्षक संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे, राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यातील प्रत्येकी तीन व कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेतील प्रत्येकी एका शिक्षिकेला हा पुरस्कार जाहीर झाला. १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण सोहळा आहे. दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण सोहळा आहे. दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, फेटा असे पुरस्काराचे स्वरुप आहे. दरम्यान त्या दिनी सकाळी दहा ते तीन या वेळेत महिला शिक्षकांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील महिला शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पत्रकार परिषदेला करवीर तालुका शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेचे बाजीराव पाटील, संचालक संभाजी पाटील, धोंडिराम पाटील, बाजीराव कांबळे, साहेब शेख, प्रशांत पोतदार, मारुती दिंडे, सर्जेराव सुतार, अशोक नायकवडे, महिला आघाडीच्या कोषाध्यक्षा लता नायकवडे, कोषाध्यक्षा नसिम मुल्ला आदी उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त महिला शिक्षक पुढीलप्रमाणे :

करवीर तालुका – शिक्षिका रेखा श्रीरंग सातुसे (विद्यामंदिर परिते नंबर एक), अस्मिता विवेक पाटील ( विद्यामंदिर पाडळी खुर्द), संजीवनी परशराम कांबळे (विद्यामंदिर नेर्ली). शिरोळ तालुका – माधुरी आण्णासो कोळी (विद्यामंदिर मराठी आलास), रुक्साना बशीर नदाफ (कन्या विद्यामंदिर दत्तवाड), लक्ष्मी तातोबा बुधावले (विद्यामंदिर दानोळी). गगनबावडा – अमृता तानाजी पाटील (केंद्र शाळा असंडोली), अनिता अंकुश शिंदे (विद्यामंदिर (असळज), सरिता संजय देसाई (विद्यामंदिर धुंदवडे). आजरा – विजयमाला सुनील देसाई (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा), रिजवान इम्रान तासेवाले (विद्यामंदिर बाची), मंगल शिवाजी पळसे (विद्यामंदिर मसोली). हातकणंगले – मुख्याध्यापिका सरिता संजीव कांबळे (विद्यामंदिर तिळवणी), प्रमिला महादेव किल्लेदार (विद्यामंदिर मजले), मयुरा सुरेश मिरजकर (विद्यामंदिर बाहुबली). गडहिंग्लज – वैशाली अरुण पाटील (बॅ.नाथ पै. विद्यालय गडहिंग्लज), अनुराधा कृष्णा क्षीरसागर (केंद्रशाळा भडगाव), वैशाली अनिल जोशीलकर (गांधीनगर हलकर्णी). भुदरगड – मुख्याध्यापिका पल्लवी ज्ञानदेव मगदूम (विद्यामंदिर तिरवडे), अश्विनी रविंद्र भालेकर (विद्यामंदिर पाचवडे), सुनिता विजय कांबळे (केंद्रशाळा कूर). चंदगड – अलका तानाजी पाटील (विद्यामंदिर तुर्केवाडी), अनिता नारायण चौगुले (विद्यामंदिर रामपूर), सीमा शिवाजी माने (कन्या विद्यामंदिर चंदगड). कागल – उज्ज्वला मारुती सावंत (विद्यामंदिर मौजे सांगाव), रेखा दत्तात्रय चव्हाण (विद्यामंदिर बोरावडे), वैभवी सतीश पाटील (विद्यामंदिर बेलवळे बुद्रुक). पन्हाळा – लता प्रविण कोळी (विद्यामंदिर मोरेवाडी), सुजाता नामदेव शिंदे (विद्यामंदिर जाफळे), निर्मला तानाजी जगताप (विद्यामंदिर माजगाव). शाहूवाडी – कमल शंकर दिंडे (केंद्रीय प्राथमिक शाळा बांबवडे), सुरेखा हौसराव गाडे (केंद्रीय प्राथमिक शाळा शिराळे मलकापूर), चेतना चतुर्धन निळकंठ (केंद्रिय प्राथमिक शाळा बांबवडे). राधानगरी –कविता कृष्णाजी रेपे (विद्यामंदिर आकनूर), आयेशा फिरोज ताशिलदार (कन्या विद्यामंदिर नरतवडे), प्रभावती दत्तात्रय कडव (केंद्रशाळा सावर्दे). कोल्हापूर – आशालता पुंडलिक खाडे (संत रोहिदास विद्यालय सुभाषनगर). इचलकरंजी – रेखा शरद सोलनकर (पंडित मोतिलाल नेहरु विद्यामंदिर इचलकरंजी)

(फोटो ओळी- पत्रकार परिषदेत बोलताना शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे, संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, संचालक बाजीराव कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता खांडेकर, महिला जिल्हा कोषाध्यक्ष नसीम मुल्ला आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!