तरुणाईला अखंड ऊर्जा अन उर्मी देणारा शिवमहोत्सव थाटात संपन्न
तरुणाईला अखंड ऊर्जा अन उर्मी देणारा शिवमहोत्सव थाटात संपन्न
पुढारीचे संपादक डॉ.प्रतापसिंह जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान.
राहुल सक्सेना व मधुरा कुंभार च्या सुरावटीने थिरकली तरुणाई
कोल्हापूर/मारुती फाळके
सारेगमप फेम गायक राहुल सक्सेना व मधुरा कुंभार च्या सुरावटीने सादर होणारी भन्नाट गाणी,साथीला शाहीर रणजित कांबळे ची पहाडी शाहिरी,सँडआर्टिस्ट अमित माळकरीचे विलक्षण सँड आर्ट,बहारदार पुरस्कार वितरण सोहळा, अफलातून रंगमंच व्यवस्था तरुणाईच्या मनाला भुरळ घालणारे कलाकारांचे सादरीकरण, शिवकालीन प्रसंगावर आधारित शिवसोहळा, लोकनृत्याचे बहारदार सादरीकरण आणि या कलाविष्काराला उपस्थिताकंडून मिळणारा भरभरुन प्रतिसाद अशा जल्लोषी वातावरणात शिवमहोत्सव सोहळा झाला. शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे आयोजित सोहळयात विविध पुरस्कारांचे दिमाखात वितरण झाले. राजमाता जिजाऊ सभागृहात रविवारी (९ मार्च) तब्बल ४ तास हा कार्यक्रम रंगला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. कुलगुरू डी. टी. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांना शिव –जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित केले. शिक्षण, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार प्रदान केले. शिव महोत्सवचे मुख्य संकल्पक डॉ. प्रविण कोडोलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान शिवमहोत्सवतंर्गत गायक राहुल सक्सेना, गायिका मधुरा कुंभार, लोकशाहीर रणजीत कांबळे, गायक कबीर नाईकनवरे आणि सँड आर्टिस्ट अमित माळकरी यांच्या सादरीकरणारे कार्यक्रम रंगतदार झाला. डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा ‘शिवसोहळा’, श्रीजा लोकसंस्कृती फाऊंडेशन आणि रिव्हॉल्युशन डान्स अॅकेडमीचा नृत्याविष्कार कार्यक्रमात धमाल उडविली.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले,
भविष्याचा वेध घेऊन सर्वसामान्यांचा ‘पुढारी’, बहुजनांचा ‘पुढारी’ म्हणून प्रत्येक प्रश्न निर्भीडपणे मांडणारा अशी दै. ‘पुढारी’ची देशभर ख्याती आहे. महाराष्ट्राच्या समाजकारण, राजकारण, अर्थकारण व सांस्कृतिक क्षेत्रातील जाधवांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.
दै.पुढारीचे संपादक सत्काराला उत्तर देताना म्हणाले,आयुष्यभर जे शिकता येईल तेवढे विद्यार्थ्यांनी शिकावे
आज जगातील सर्वांत जास्त ६८ टक्के तरुण भारतात आहेत. २०३० पर्यंत भारत देश जगातील तरुण राष्ट्र ठरणार आहे. चार उच्चशिक्षितांमधील प्रत्येक व्यक्ती भारतातील विद्यापीठातील असणार आहे. कितीही शिक्षण घेतले तरी ते अपुरे आहे. शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थीदशेत आयुष्यात जे जे शिकता येईल ते विद्यार्थ्यांनी शिकून मोठे होण्याचा प्रयत्न करावा, असा मौलिक सल्ला डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी यावेळी दिला.
अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
डी. टी. शिर्के होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर, समन्वयक अॅड. मंदार पाटील, प्राचार्य डॉ. सरदार जाधव, विवेकानंद शिक्षण सचिव कौस्तुभ गावडे,डॉ.प्रियांका धनवडे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. सरोज बीडकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी कुलसचिव व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अजितसिंह जाधव, कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक धनंजय नाकाडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. तानाजी चौगले, प्राचार्य सरदार जाधव, माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, डॉ. प्रियंका धनवडे, शिव महोत्सव समितीचे समन्वयक अॅड. मंदार पाटील, प्रवीण साळुंखे, डॉ. चांगदेव बंडगर, अभिजीत राऊत, अजिंक्य शिंदे, अॅड, चंद्रकांत कुरणे आदी उपस्थित होते.
…,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
या झाला गुणीजणांचा सन्मान…!
याप्रसंगी कुलगुरू डी. टी. शिर्के, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे यांना विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरविले. विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांना शिव-संस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवपुरस्कारांनी, डॉ. अशोक बन्ने, डॉ. शिवाजी जाधव, श्रीमती अमृता मांजरेकर, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. शरद गायकवाड, डॉ. सत्यजित कोसंबी यांना शिव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशासकीय क्षेत्रातील उपकुलसचिव संजय कुबल, डॉ. उत्तम सकट, तेजस्विनी भोसले, प्रवीणकुमार जाधव, शशिकांत कदम, सुरेश वाघवेकर, सनतकुमार आडमुठे, जबराव शेळके, सरदार सानदकर यांचा पुरस्कारांनी सन्मान झाला. सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल रणजीत गवळी, संदिप चव्हाण यांचा तर क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल साहिल गुजर, साराश साळुंखे यांचा सन्मान झाला.
चौकट-१
हदद्दवाढीसाठी दै. ‘पुढारी’ने पुढाकार घ्यावा आ. राजेश क्षीरसागर
दै. ‘पुढारी’ने कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्याचे काम केले आहे. सध्याचा कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा असलेला हद्दवाढीच्या प्रश्नात डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी लक्ष घातल्यास तो प्रश्न सुटेल. हा प्रश्न सोडविण्यासाठी डॉ. जाधव यांनी सर्वांना एकत्र करून व्यापक बैठक घ्यावी, अशी मागणी आ. राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली.
चौकट-२.
‘सांस्कृतिक कार्यक्रमांत थिरकली तरुणाई!’
शिव महोत्सवात सारेगमप फेम गायक राहुल सक्सेना, गायिका मधुरा कुंभार यांनी बहारदार मराठी, हिंदी गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तर लोकशाहीर रणजित आशा अंबाजी कांबळे आणि सँड आर्टिस्ट अमित माळकरी यांचे सादरीकरण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. त्याचप्रमाणे डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचा शिवसोहळा, श्रीजा लोकसंस्कृती फाऊंडेशन (नृत्य दिग्दर्शक चंद्रकांत पाटील) आणि रिव्हॉल्युशन डान्स अॅकॅडमी (नृत्य दिग्दर्शक रोहित पाटील) यांच्या नृत्याविष्काराने दर्शकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. प्रतापसिंह जाधव यांना मिळालेल्या शिव-जीवन गौरव पुरस्कारास वेगळा संदर्भ आहे. शिवाजी विद्यापीठाची स्थापना व्हावी, असे दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांनी स्वप्न पाहिले, ते पूर्ण झाले. त्यांच्यानंतर डॉ. प्रतापसिंह जाधव
यांनी ५० वर्षांपूर्वी विद्यापीठात ललित कला विभाग स्थापना समितीचे अध्यक्ष म्हणून खास प्रयत्न केले. या दोन्ही गोष्टींचे श्रेय जाधव कुटुंबीयांना जात असून कृतज्ञता म्हणून त्यांना शिव-जीवन गौरव पुरस्कार दिल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी शैक्षणिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना शिव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच पियू फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
(फोटो ओळी-कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी कृती समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ सभागृहात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शिव-जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, आ. राजेश क्षीरसागर. समवेत डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. प्रवीण कोडोलीकर, कौस्तुभ गावडे, प्राचार्य सरदार जाधव, अँड. मंदार पाटील, अजिंक्य चव्हाण, डॉ. प्रियंका धनवडे आदी.)










