March 24, 2026

शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नतीची पदे भरण्यासाठी पाठपुरावा करू-ना.आबिटकर,’पुरोगामी शिक्षक’ ला आश्वासन

0
IMG-20250316-WA0018

शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३-वर्ग २ ची पदोन्नतीची पदे भरण्यासाठी पाठपुरावा करू.
नामदार प्रकाश आबिटकर यांचे पुरोगामी शिक्षक संघटनेस आश्वासन.

कोल्हापूर/मारुती फाळके
महाराष्ट्र राज्यात सन १९६७ पासून पदोन्नतीने भरावयाची रिक्त असलेली शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३- वर्ग २ ची पदे भरण्यासाठी असलेली सेवेची अट शिथील करून सदर पदे पदोन्नतीने भरावीत यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे आश्वासन कोल्हापूर जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.*
यावेळी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश) नियम १०६७ अन्वये शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३- वर्ग ३ या पदांवार ५ वर्षे सेवा झालेल्या विस्तार अधिका-यांनाच श्रेणी ३- वर्ग २ पदांवर पदोन्नती देण्याची तरतूद आहे.
मात्र शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३- वर्ग ३ ची पदांवरील पदोन्नती सेवानिवृत्तीस ६ महिने ते १ वर्ष शिल्लक असताना होत असते. त्यामुळे सदर पदावर ५ वर्षे सेवा कोणाचीही होत नल्याने विस्तार अधिकारी श्रेणी ३- वर्ग २ ची पदे कायमच रिक्त राहीली आहेत.
सदरची पदे भरता यावीत यासाठी श्रेणी ३- वर्ग २ पदावर ५ वर्षे असलेली सेवेची अट रद्द करून सदर पदोन्नती पदवीधारक व बी.एड अर्हता धारण केलेल्या शिक्षकांमधून सेवाज्येष्ठतेनुसार होणे आवश्यक आहे. तसेच सदर पदोन्नतीसाठी दि.१०/०६/२०१४ च्या अधिसुचनेतील पदवी ५०% व बी.एड. ५० गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असलेले अटही रद्द होणे आवश्यक असल्याने संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
===================
चौकट-
*पर्यवेक्षक यंत्रणेतील १००% पदे भरलेली असणे आवश्यक..*
आज रोजी राज्यात अनेक उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. त्यातच शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी ३- वर्ग २ ची पदे अवाजवी अटीमुळे वर्षोनुवर्षे रिक्त आहेत. सदर पदांच्या पदोन्नतीसाठी असलेली सेवेची व ५०% गुणांची अट रद्द होऊन सेवाज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांमधून पदोन्नती होणे आवश्यक आहे.
-प्रसाद पाटील
राज्याध्यक्ष- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना.
====================
नामदार प्रकाशआबिटकर यांना भेटलेल्या शिष्टमंडळात संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के पाटील, मार्गदर्शक के.एस.पाटील, राज्य संघटक पी आर पाटील, सुभाष केरिपाळे, एन. डी. साळवी, आर.आर.पाटील, संतोष बिल्ले, विश्वास रणदिवे आदी शिक्षक उपस्थित होते.

(फोटो ओळ-
नामदार प्रकाश आबिटकर यांचे समवेत शैक्षणिक प्रश्नांबाबत चर्चा करताना प्रसाद पाटील, एस के पाटील, के एस पाटील आदी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!