March 24, 2026

स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची राज्यशासनाकडून दखल.तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र केदार यांना राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक जाहीर.

0
IMG-20250328-WA0020

स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची राज्यशासनाकडून दखल.

तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र केदार यांना राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक जाहीर.

कोल्हापूर/मारुती फाळके

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर यादववाडी उचगाव ता.करवीर शाळेच्या”स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची राज्यशासनाकडून दखल घेऊन तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र केदार यांच्या राजीव गांधी गतिमान प्रशासन अभियान स्पर्धेत कर्मचारी गटातून ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या उपक्रमाला राज्यस्तरावर नुकताच प्रथम क्रमांकाचे  पारितोषिक जाहीर झाले आहे. रु.५०,०००/- रोख व स्मृतिचिन्ह असा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी नागरी सेवा दिनाच्या दिवशी मोठ्या थाटात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,विविध खात्याचे अधिकारी यांच्याहस्ते २१ एप्रिल रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

राजीव गांधी गतिमान प्रशासन अभियान स्पर्धेत कर्मचारी गटातून ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या उपक्रमाला राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेला हा सन्मान मिळाल्यामुळे राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेची विशेष ओळख राज्याच्या पटलावर झाली आहे.

मनात कठोर निश्चय केला..सचोटीने कार्य सुरू केले.. ते करत असताना अनेक अडचणी आल्या.. प्रसंगी संघर्षही करावा लागला पण या सगळ्यातून आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न अशी देशातील पहिली ’स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ उभा राहिली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजयसिंह चव्हाण, मा. संतोष पाटील जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांनी तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र केदार यांची कल्पकता व ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची उपयुक्तता ओळखून विद्या मंदिर यादववाडी शाळेत ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या प्रकल्पाला तब्बल ३४ लक्ष एवढा निधी दिला. रविंद्र केदार यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर शेअर केले. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन ग्रामस्थ, पालक व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षणप्रेमींनीही त्यांना या नवोपक्रमासाठी मदत केली. यातून शाळेत प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड, आय सी टी लॅब, इंनोवेशन लॅब, आनंददायी वातावरण निर्मिती साठी बोलक्या भिंती, कलामंच, गुगल क्लासरूम इत्यादी अत्याधुनिक सुविधा प्राप्त झाल्या. शाळा ग्लोबल झाली. शाळेचे पूर्ण रुपडे बदलले. यामुळे शाळेची पटसंख्या देखील वाढली. या भविष्यवेधी नवोपक्रमामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुले अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण घेत आहेत. या शाळेत निर्माण केलेल्या २१ व्या शतकातील ग्लोबल वर्गाच्या मदतीने विद्यार्थी बाहेरील जगाशी सहज जोडले जातात. शिक्षक इंटरनेटच्या साहाय्याने दर्जेदार शैक्षणिक साहित्य वापरू शकतात यामुळे विद्यार्थ्यांचे गुणवत्ता संवर्धन होण्यास मदत होते. अशा बहुउपयोगी असणाऱ्या या नवोपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्यशासनाच्या सामान्यप्रशासन विभागाच्या वतीने सन २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या ‘राजीव गांधी गतिमान प्रशासन अभियान स्पर्धेत कर्मचारी गटातून ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ या उपक्रमाला राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. ५०,००० रु रोख व स्मृतिचिन्ह असा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरवर्षी नागरी सेवा दिनाच्या दिवशी मोठ्या थाटात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,विविध खात्याचे अधिकारी यांच्याहस्ते २१ एप्रिल रोजी या पुरस्काराचे वितरण होते. या पुरस्कारामुळे रविंद्र केदार यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या संकल्पनेच्या पूर्तीसाठी त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, संतोष पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर, डी. सी. कुंभार, शाळेचे मुख्याध्यापक अंबादास बडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक वृंद, पालक यांचे अनमोल सहकार्य मिळाले.

[ चौकट ]
वंचितांच्या मुलांच्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. दातृत्वाचे हात पुढे आले. आम. सतेज पाटील व आम. ऋतुराज पाटील, सरपंच याचेही सहकार्य लाभले. नवोपक्रम राबविताना अडचणी आल्या. पण विद्या मंदिर यादववाडी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल झाली. माझी बदली सरनोबतवाडी येथे झाली आहे. या शाळेत ही स्मार्ट टू ग्लोबल स्कूल उपक्रम राबविण्यात येत आहे. पुरस्कारामुळे नवीन ऊर्जा मिळाली.

रविंद्र केदार
सध्या कार्यरत अध्यापक- विद्या मंदिर, सरनोबतवाडी

(फोटो ओळी- राज्यातील आदर्श,जिल्हा परिषदेची शाळा स्मार्ट टू ग्लोबल विद्या मंदिर यादववाडी,पुरस्कार विजेते उपक्रमशील शिक्षक रवींद्र केदार.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!