December 12, 2025

भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी ६ लाखांचा नफा -संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील- भेडसगावकर

0
IMG-20250402-WA0042

भेडसगाव नागरी पतसंस्थेला २ कोटी ६ लाखांचा नफा -संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील भेडसगावकर

२०० कोटी ठेवींचा टप्पा लवकरच पूर्ण मानस

पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित पतसंस्था

भेडसगाव/मारुती फाळके

ग्राहकाभिमुख पारदर्शी कारभार व सभासदांचा विश्वास संपादन करत,ग्रामीण भागातुन शहरी भागाकडे दमदार वाटचाल करणारी,महाराष्ट्र शासनाचा सहकारतील मानबिंदू गौरव पुरस्कारप्राप्त ‘भेडसगाव नागरी पतसंस्थेला’ यंदाच्या आर्थिक वर्षात २ कोटी ६ लाखांचा नफा झाल्याची माहिती भेडसगाव नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील -भेडसगावकर यांनी दिली.

ते म्हणाले संस्थेच्या ग्राहकाभिमुख कारभारावर विश्वास टाकत ठेवीमध्ये १२.४२% वाढ होऊन संस्थेने १८० कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे.संस्थेची एकूण तरलता – एकूण ठेवी १८०.०४ कोटी असून रोख व बँक शिल्लक रु. ५.६१ कोटी, गुंतवणूक रु.७०.५१ कोटी, ठेवतारण कर्जे रु. ६.३७ कोटी व सोनेतारण कर्जे रु.४७.६१ कोटी यांची एकत्रित स्वकम रु.१३०.१० कोटी असून यावे एकूण ठेवीशी प्रमाण ७२.२६% इतके आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण ९७.९६% असून थकबाकीचे प्रमाण २.०४% इतके आहे. संस्थेच्या एकूण व्यवसायामध्ये १४.२४% वाढ होऊन
३०३ कोटी ६७ लाख इतका विक्रमी व्यवसाय झाला आहे. संस्थेने सध्या एकूण ठेवीच्या ७० कोटी ५१ लाख इतकी गुंतवणूक इतर बँकात केली आहे.सातत्याने संस्थेचा ऑडिट वर्ग ‘अ’ आहे.

पुढील आर्थिक वर्षात २०० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.संस्थेचे सध्याचे भाग भांडवल व निधी १९कोटी ७१ लाख असून प्रतिवर्षी सभासदांना १० टक्के लाभांश दिला जातो.मयत सभासदांच्या वारसांना विशेष सवलत, आजारी सभासदांना मदतनिधी, संस्था कर्मचारी व सभासद यांना ३ लाखांचा वैद्यकीय विमा व संस्था कर्मचाऱ्यांचा १० लाखाचा विमा संस्थेने उतरवला आहे.

संस्थेने सध्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठेव व कर्ज योजनेच्या अनेक अभिनव व नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहे. संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणाऱ्या संस्थेच्या राज्यात २१ शाखा कार्यरत असून लवकरच पनवेल जि. रायगड व साळवण,गगनबावडा जि. कोल्हापूर येथे दोन शाखांना मंजुरी मिळाली असून या दोन शाखा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

संस्थेने सभासदांचे आर्थिक हित जोपासणाऱ्या अनेक योजना सुरू केल्या असून या नव्या योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. नुकतेच संस्थेने अत्याधुनिक ई-तंत्रज्ञानाशी सांगड घालत संस्थेचे ‘मोबाईल ॲप’ सुरू केले असून एका क्लिकवर ग्राहक ई -व्यवहार करू शकतात. ग्राहकांनी संस्थेच्या अभिनव ठेव योजना व कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील यांनी केले.

यावेळी युवा नेते अमरसिंह पाटील, संग्राम पाटील,संस्थेचे व्हा. चेअरमन,
संचालक आप्पाजी पाटील, विठ्ठल पाटील, महादेव बुवा, बाळकृष्ण पाटील, विलास यादव, राजेंद्र कुसळे, अशोक आडसूर, इंदुबाई पाटील नंदाताई पाटील,जनरल मॅनेजर संजय पाटील, गोविंद पाटील,संपत कोकाटे, भरत माईंगडे,अधिकारी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट-

संपूर्ण महाराष्ट्रात शाखाविस्तार व व्यवसायवृद्धी यावर लक्ष केंद्रित–हंबीरराव पाटील (संस्थापक चेअरमन)

सहकार शताब्दी वर्षानिमीत्त महाराष्ट्र शासनाने सहकाराचा मानबिंदु म्हणुन गौरवलेली पतसंस्था असून संस्थेला आजवर आदर्श पतसंस्था पुरस्कार, बैंको व पतसंस्था फेडरेशनचे पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेमध्ये सध्या मोबाईल अँप, RTGS /NEFT सुविधा, डिमांड ड्राप्ट या अद्ययावत सुविधा संस्थेत सुरू आहेत.
विज बिल भरणा सुविधा,विश्वास साखर व उदय साखर कारखाना ऊस बिल वितरण आदी योजना व सुविधा उपलब्ध आहेत. भविष्यात संस्थेचा शाखा विस्तार, ठेवीमध्ये- कर्ज वाटपात वाढ, व्यवसायवृध्दी यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे
—- हंबीरराव पाटील
संस्थापक चेअरमन,भेडसगाव नागरी पतसंस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!