March 24, 2026

उपक्रमशील शिक्षक सुनील सुतार याना रोटरी चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

0
IMG-20250403-WA0040

उपक्रमशील शिक्षक सुनील सुतार याना रोटरी चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कोल्हापूर/प्रतिनिधी

विद्या मंदिर कोगील खुर्द शाळेतील तंत्रस्नेही, उपक्रमशील, विद्यार्थीप्रिय व होतकरू शिक्षक सुनिल आबाजी सुतार यांना रोटरी क्लब ऑफ रॉयल कोल्हापूर यांचा सन २०२४/२५ यावर्षीचा देण्यात येणारा नेशन बिल्डर अवॉर्ड हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिष्यवृत्ती,जिल्हास्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धेतील यश, अनेक शैक्षणिक उपक्रम , भरघोस शालेय शैक्षणिक उठाव, सामाजिक उपक्रम , समाज बांधिलकी अशा विविध कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
शिक्षक ,पालक ,समाज या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार दि. १० एप्रिल रोजी रोटरी समाजसेवा केंद्र नागाळा पार्क कोल्हापूर येथे सायंकाळी ५:३० वा संपन्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!