March 18, 2026

करवीर तालुका जुनी पेन्शन संघटनेचे कार्य कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील

0
IMG-20250507-WA0039

करवीर तालुका जुनी पेन्शन संघटनेचे कार्य कौतुकास्पद – गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील

करवीर तालुका जुनी पेंशन संघटनेतर्फे ७५ गुणवंत शिक्षकांचा सत्कार

कोल्हापूर/मारुती फाळके

करवीर तालुका जुनी पेन्शन संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील यांनी व्यक्त केले.

ते विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा करवीर यांच्यावतीने चालू सालातील ७५ गुणवंत शिक्षकांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमात बोलत होते.यावेळी क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक , साहित्यिक, व्हिडिओ निर्मिती, आदर्श शिक्षक, नूतन निवड झालेले संचालक, नवीन शिक्षणसेवक तसेच आंतरजिल्हा बदली होऊन आलेले शिक्षक या सर्वांचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह ,पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना समरजीत पाटील म्हणाले, जुनी पेन्शन संघटनेचे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे जानेवारी २०२५ मध्ये अत्यंत नियोजनबद्ध घेतलेल्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा, प्रशासनामध्ये शिक्षकांच्या कामासाठी मिळणारे सहकार्य, आजचा गुणगौरव सोहळा यामुळे संघटनेचे अभिनंदन केले तसेच तरुण शिक्षकांनी आपल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या सहकाऱ्यांना आपल्या शाळेला सोबत घेऊन त्यांनाही प्रशिक्षित करून शाळेचा विकास करावा. आपल्याजवळ विविध कलागुण आहेत याचा वापर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून करवीर तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर उपस्थित होते. ३१ मे अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत त्या निमित्ताने संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी बोलताना त्यांनी आपला जीवन प्रवास मांडला तसेच यापुढेही शैक्षणिक सामाजिक कार्यात नेहमीच तुमच्या सोबत असेल असे आश्वासित केले आणि संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देऊन यापुढेही अजून आणखी चांगले कार्य चांगले उपक्रम आपल्या संघटनेकडून आयोजित व्हावेत अशी अपेक्षा केली.

यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय ओतारी साहेब यांनी आपल्या खास शैलीत करवीर तालुक्यातील शिक्षकांना हिऱ्याची खाण असे संबोधन देऊन कौतुक केले तसेच आपले आरोग्य, आपले कुटुंब सांभाळून आपली सेवा हसत खेळत आनंददायी पार पाडावी असे मत मांडले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मंगेश धनवडे यांनी करवीर तालुका म्हणजे उत्कृष्ट नियोजन असा उल्लेख करून या तालुक्यात संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष गायकवाड तालुकाध्यक्ष बाबुराव निकम आनंदा बनकर माळी मॅडम व सर्व महिला टीम या सर्वांच्या नियोजनातून संघटनेचे कार्य जिल्ह्याला आदर्श व मार्गदर्शक असल्याचे अभिमानाने सांगितले.

प्रास्ताविकात बोलताना संतोष गायकवाड म्हणाले आपल्या शिक्षक बंधू-भगिनींचे कौतुक व्हावे, त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठीच हा गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे. आपल्या सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा.. संघटनेच्या वतीने शिक्षक क्रीडा स्पर्धा आणि गुणगौरव सोहळा हा अविरत सुरू राहील असे सांगितले.
पन्हाळ्याचे माजी गटशिक्षणाधिकारी व करवीर चे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी मानकर यांनी बोलताना सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून करवीर तालुक्यात आणखी जोमाने काम करा असे आवाहन केले.

सत्कारमूर्ती च्या वतीने पाडळी खुर्द शाळेच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शिका ज्यांची एकाच वेळी नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत त्या अस्मिता पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेने आमच्या विशेष कार्याचा आठवणीने गौरव केला त्याबद्दल आभार मानून पुढील काळात आणखीन चांगले काम करून दाखवू असे सांगितले.

यावेळी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे, अर्चना पाथरे, शिक्षक बँक व्हा चेअरमन सौ.पद्मजा मेढे, संचालक अमर वरुटे, मुख्याध्यापिका आशा शेळके, सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा प्रवक्ता प्रमोद पाटील, जिल्हाध्यक्ष आरती पोवार, भुदरगड तालुकाध्यक्ष बाबुराव कांबळे, संजय पाटील, धनाजी सासणे, बाबा धुमाळ, प्रवीण पाटील उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदा बनकर, नितीन कांबळे , मिलिंद कांबळे, अमर पाटील, अरुण टिपुगडे ,संतोष चिमले, मुरली कुंभार , महेश कोरवी, सचिन सुतार, सुनील सुतार ,रमेश सूर्यवंशी, सुनील सदाशिव सुतार, प्रशांत देवरुखकर, चेतन शिंदे , शिवतेज बाजारी, काशिनाथ बिरूनगी, महेंद्र कांबळे रवि केदार, रत्नाकर लाड राहुल झिरमिरे, महेश दावणे,श्री अनिल पाटील, श्रीम सादिया मुजावर,सौ संगीता दिवटे, जैनब शेख, स्वप्नाली कतगर , रश्मी मनुगडे,दिपाली कतगर, संबोधी गायकवाड, संयोगिता महाजन,पूनम पाटील ,स्वाती गावडे ,स्मिता कांबळे, राजश्री संगशेट्टी,श्रुती कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या.

स्वागत तालुकाध्यक्ष बाबुराव निकम, सूत्रसंचालन महिला तालुकाध्यक्ष स्नेहा माळी तसेच आभार जिल्हाध्यक्ष आरती पोवार यांनी मानले.

(फोटो ओळी-करवीर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांच्यासमवेत गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील, आनंदा आकुर्डेकर,अर्चना पाथरे, सर्जेराव मानकर, प्रकाश आंग्रे, सोबत मंगेश धनवडे, अमर वरुटे, संतोष गायकवाड, आरती बुवा,बाबुराव निकम आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!