जुनी पेंशन संघटनेच्या वतीने आज शिक्षकांचा गुणगौरव- तालुकाध्यक्ष बाबुराव निकम,शिक्षकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे.
जुनी पेंशन संघटनेच्या वतीने आज शिक्षकांचा गुणगौरव- तालुकाध्यक्ष बाबुराव निकम,
शिक्षकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे.-जुनी पेंशन संघटना करवीर
कोल्हापूर/मारुती फाळके
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा करवीर यांच्या वतीने आज २मे रोजी विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे दु.१२:३० वाजता शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित केला असल्याची माहिती जुनी पेंशन संघटना करवीर चे तालुकाध्यक्ष बाबुराव निकम व जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाखा करवीर यांच्या वतीने सन २०२४/२५ सालातील उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षक-शिक्षिका यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक २ मे २०२५ रोजी विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला हॉल शिंगणापूर या ठिकाणी होत आहे.
या गुणगौरव सोहळ्यामध्ये आपल्या शिक्षक बांधवांना एक प्रेरणा मिळावी म्हणून कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले. यामध्ये शासकीय कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धेतील विजेते शिक्षक नवोदय मार्गदर्शक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था मार्फत आयोजित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेतील यशस्वी शिक्षक, पुस्तक प्रकाशन झालेले शिक्षक तसेच विविध सामाजिक शैक्षणिक संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी अशा ५१ शिक्षक बांधवांचा कोल्हापुरी फेटा, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जाणार आहे
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून करवीर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव आकुर्डेकर श्रीमती सुजाता गायकवाड , शिवाजी मानकर, विजय ओतारी, प्रकाश आंग्रे ,श्रीमती अर्चना पाथरे, कोल्हापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे,शिक्षक बँक चेअरमन सुरेश कोळी, व्हा.चेअरमन पद्मजा मेढे,शिक्षक बँक संचालक व जुनी पेंशन संघटनेचे सल्लागार अमर वरूटे, श्रीनाथ पाटील,विजय रामाने, आशा शेळके तसेच कोल्हापूर जिल्हा व तालुका जुनी पेन्शन संघटना सन्माननीय सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महिला तालुकाध्यक्ष स्नेहा माळी यांनी दिली.या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जुनी पेंशन च्या जिल्हाध्यक्षा आरती बुवा,कोषाध्यक्ष निलेश कारंडे, संजय पाटील, सादिया मुजावर, संगिता अलगौंडर, आनंदा बनकर, लक्ष्मण घावटे, नितीन कांबळे, अमर पाटील, प्रशांत देवरुखकर, अरुण टिपुगडे, सचिन सुतार,सुनील सुतार, मिलिंद कांबळे, अनिल सुतार, भोलानाथ भोसले ,श्रीम जैनब शेख, अनुराधा वळसंगकर, दिपाली कतगर, स्वप्नाली कतगर, संयोगिता महाजन, पूनम पाटील, दिपाली किरुळकर सह जुनी पेन्शनचे शिलेदार मेहनत घेत आहेत.










