सभासदांचा एक-एक प्रश्न आणि एक-एक रुपयाचा हिशोब देत नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही- चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील
सभासदांचा एक -एक प्रश्न आणि एक-एक रुपयाचा हिशोब देत नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही- चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या दि. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या ७ सप्टेंबर रोजी होत आहे. जनरल सभेच्या निमित्ताने शिक्षक सभासदांना, सर्वच आज माजी संचालकांना आवाहन करताना शिक्षक बँकेचे नूतन चेअरमन शिवाजीराव रोडे- पाटील म्हणाले, शिक्षक बँक, बँकेचा व्यवहार बँकेची होत असलेली प्रगती यासाठी सर्व सभासदांनी सभागृहात यावं आणि बँकेची सद्यस्थिती पत्रकबाजी पेक्षा वास्तवात काय आहे ती जाणून घ्यावी. सभासदांचा एक-एक प्रश्न आणि एक-एक रुपयाचा हिशोब देत नाही, तोपर्यंत मी व माझे संचालक मंडळ सभागृह सोडणार नाही, असे मी समस्त सभासदांना आश्वासन देतो.
गेल्या ३ वर्षातील बँकेच्या कामकाजाचा सर्व लेखाजोखा राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडीच्या संचालकांनी गत तीन सालात केलेला कारभार जाणून घेण्यासाठी विशेष करून महिला सभासदांनी अगदी अगत्याने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.बँकेच्या लेखाजोख्या बाबत बोलताना ते म्हणाले, बँकेच्या लेख्या जोख्या बाबत तुम्हाला अश्वस्त करतो की,यापुढेही बँकेत चाललेल्या प्रगतीत आणखी वाढ होईल.
ते म्हणाले, विरोधकांचं काम असतं आरोप करणे. परंतु आम्ही कामातून बोलणारी माणसं आहोत आम्हाला त्यांच्या आरोपात पडायचे नाही. विरोधकांच्या कार्यकाळात किमान ६% ने सभासदांना ५.२५ कोटी डिव्हिडंड वाटणे अपेक्षित होते. त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळाचा व आम्ही कारभार करत असलेल्या तीन वर्षाच्या कार्यकाळाची तुलना केली,तर त्यांनी केवळ सव्वा दोन कोटी रुपये डिव्हीडंड आणि एक वेळेस नऊ टक्के प्रमाणे डिव्हिडंट वाटप केला होता. परंतु आम्ही फक्त तीन वर्षाच्या कार्यकाळात साडेपाच कोटी डिव्हिडंड वाटप केला आहे. “इथेच लक्षात येते सभासदांच्या घामाच्या पैशाची किती मोठी उधळपट्टी विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात केली होती”. त्यांनी केलेल्या अनेक खर्चामध्ये आम्ही बचत केली आहे.
लोकशाहीत विरोधक हे असावेत परंतु त्यांनी काही बेताल बोलावं हे आम्हाला कदापी मान्य होणार नाही. त्यांनी पत्रकबाजी केली यातच आम्ही आमचे यश समजतो.आज विरोधकांची वन अँड ओन्ली पोटदुखी आहे की, बँकेला झालेला नफा विरोधकांना माहित आहे. त्यांनी बघितले आहे. बँकेत कारभार केला आहे. इतकं कमी मार्जिन असताना “मोठा नफा आणि सभासद आनंदात राहतो” आहे हीच त्यांची पोटदुखी आहे हा आमचा समज व्हायला लागला आहे.
मी समस्त सभासदांना विनंती करतो की, तुम्ही तुमचे जे काही प्रश्न शंका असतील अगदी तुमच्या प्रश्नाचे समाधान होत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सभागृहात थांबा. विरोधकांनी हुर्रे-दंगा करून सभागृह सोडू नये.,अशी माझी कळकळीची विनंती आहे. एका सुद्धा शब्दाला, प्रश्नाला किंवा आकडेवारीला मी व माझे संचालक मंडळ उत्तर द्यायला बांधील आहे. विरोधकांनी सभेला यावे व शांततेचे सहकार्य करावे.
शेवटी ते म्हणाले वार्षिक सर्वसाधारण सभा ही सहकारी संस्थांची सर्वोच्च अशी गोष्ट असते.या सर्वोच्च सोहळ्याला गालबोट लावू नका अगदी दिवे लावून कितीही उशीर झाला तरी आपण सभा चालवु. शेवटचा प्रश्न जाणून घेऊनच आणि जोपर्यंत आपल्या शंकांचे समाधान होत नाही तोपर्यंत आपण सभागृह सोडू नका आपल्या प्रश्नाचे निरसन झाले, तेव्हाच आपण सभागृह सोडा अशी सर्वच सभासदांना व विरोधकांना विनंती करतो.










