May 14, 2026

कास्ट्राईब शिक्षक संघटना हातकणंगले तालुकाध्यक्षपदी सुशांत भंडारे, सरचिटणीसपदी प्रशांत जयकर “काष्ट्राईब”ने शिक्षकहिताची अनेक कामे मार्गी लावली- गौतम वर्धन

0
IMG-20251102-WA0061(1)

कास्ट्राईब शिक्षक संघटना हातकणंगले तालुकाध्यक्षपदी सुशांत भंडारे, सरचिटणीसपदी प्रशांत जयकर

“काष्ट्राईब”ने शिक्षकहिताची अनेक कामे मार्गी लावली- गौतम वर्धन

हातकणंगले/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब शिक्षक संघटना हातकणंगले तालुकाध्यक्षपदी सुशांत रामचंद्र भंडारे, सरचिटणीस प्रशांत श्रीकांत जयकर,कार्याध्यक्ष अभिजित जुगाप्पा कांबळे, कोषाध्यक्ष राजाराम कोठावळे, उपाध्यक्षपदी शशिकांत खांडेकर,अमोल गायकवाड यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या. संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन रुकडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन होते.

सभेत सुहास कदम,जयेंद्र लाटणे यांच्या तालुका मार्गदर्शकपदी निवडी करण्यात आल्या.
हातकणंगले तालुका काष्ट्राईब संघटनेच्या झालेल्या आज झालेल्या सहविचार सभेत तालुका कार्यकारणी निवडण्यात आली.

यावेळी निवडसभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन म्हणाले, काष्ट्राईब संघटना ही फक्त मागास प्रवर्गासाठी काम करणारी नसून समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारी शासन नोंदणी कृत अधिकृत संघटना आहे. या संघटनेने आजवर शिक्षक हिताची अनेक कामे मार्गी लावली आहेत.शिक्षक बांधवांचे जात पडताळणी प्रमाणपत्र,फंडाच्या पावत्या, मेडिकल बिले, रोस्टर या सर्वच कामासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असते.शासनदरबारी या संघटनेला घटनात्मक वलय असल्यामुळे नेहमीच शासन यंत्रणेवर या संघटनेचा दबाव राहिलेला आहे. संघटनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये सातत्याने शिक्षक हिताची कामे करण्यासाठी प्राधान्य दिलेले आहे.दर तीन महिन्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत या संघटनेची बैठक होऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातात व शासन दरबारी त्याचे लिखित स्वरूपात प्रोसिडिंग तयार होते जिल्हा परिषदेमध्ये स्वतंत्र कारले असणारी कास्ट्राप शिक्षक संघटना ही एकमेव संघटना असल्याचेही वर्धन यांनी सांगितले.

संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय कुर्डूकर म्हणाले,संघटनेने नेहमीच शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. सर्वसाधारण पदोन्नत्या,सेवेतील लाभ बिंदूनामावलीप्रमाणे पदोन्नत्या,एखाद्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला तर काष्ट्राईब शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. संघटनेच्या एकजुटीमुळेच आजवर शिक्षक हिताची अनेक कामे मार्गी लागली आहेत. संघटनेचे जाळे राज्यभर असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटना सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करत असते.

यावेळी काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पी डी सरदेसाई म्हणाले, संघटना सर्व केडरसाठी काम करणारी संघटना आहे. दर तीन महिन्याला प्रशासनातील सर्व विभागप्रमुखासमवेत अनुशेष भरती, अनुकंपा, पदोन्नती तसेच अन्य प्रश्न घेऊन प्रशासनाबरोबर संघटनेच्या बैठका होत असतात. कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न घेऊन त्याचा निपटारा करणारी ही एकमेव संघटना आहे. ७ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या “शाळा प्रवेश विद्यार्थी दिनाचे” औचित्य साधून सातारा येथे संघटनेचे ऐतिहासिक अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरदेसाई यांनी केले.

यावेळी नूतन कार्यकारिणीचे उपस्थित सर्वांनी अभिनंदन केले आणि संघटनेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत विजय कांबळे,प्रास्ताविक मावळते अध्यक्ष दिलीप कांबळे तर आभार जिल्हा संघटक सुरेश जाधव यांनी मानले.

या निवड सभेस संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आकाराम कांबळे, तानाजी गस्ते, विकास चव्हाण,मारुती फाळके तुकाराम माने,डी ए गायकवाड, ‘उर्दू’चे जिल्हाध्यक्ष समीर नायकवडे जमीर नायकवडे व शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीने जोमाने कामाला लागावे- विजय कांबळे जिल्हा उपाध्यक्ष

नव्या कार्यकारिणीने जोमाने काम करण्यासाठी नव्या ताकदीने कामाला लागावे. त्यासाठी जिल्हास्तरावरून सर्वतोपरी पाठबळ देण्यात येईल.तालुक्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटाक्षाने लक्ष घालावे.लवकरच आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत संघटनेचे भव्य अधिवेशन घेणार आहे.तालुक्यात शाळाशाळात संविधान व शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका देऊन विधायक कामाची चळवळ सातत्याने सुरू आहे.
— विजय कांबळे- चोकाककर म्हणाले.

शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य- नूतन तालुकाध्यक्ष सुशांत भंडारे

‌हातकणंगले तालुका हा अडीच ब्लॉकचा तालुका असून प्रशासकीय कामे होण्यासाठी शिक्षकांना संघर्ष करावा लागतो. ही कामे संघटनेच्या माध्यमातून तात्काळ होण्यासाठी प्रयत्नशील राहीन. यातून शिक्षकांची बांधिलकी जोपासण्यासाठी माझे प्राधान्य राहील.

(फोटो ओळी-हातकणंगले तालुका नूतन कार्यकारिणीचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, संजय कुर्डुकर, पी डी सरदेसाई, आकाराम कांबळे, तानाजी गस्ते, विजय कांबळे, सुहास कदम, विकास चव्हाण,दत्तात्रय गायकवाड, समीर नायकवडे,जमीर नायकवडे आदी.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!