खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची सभा खेळीमेळीत
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
कोल्हापूर /मारुती फाळके
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटीमध्ये खेळीमेळीत संपन्न झाली. .
दीप प्रज्वलनाने सभाला सुरुवात झाली. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने केलेले प्रगती आर्थिक उलाढाल व नफा विभागणी इत्यादी बाबत पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.
सचिव सारिका पाटील यांनी नोटीसीचे वाचन केले तर अंदाजपत्रक नफा तोटा पत्रक ताळेबंद व नफा विभागणी इत्यादी विषय मंजुरीसाठी कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी सभेसमोर ठेवले त्याला सभासदांनी टाळ्या वाजवून एकमताने मंजुरी दिली.
यावेळी कर्जावरील येणे व्याज संस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवाशर्ती नियमावली नफा विभागणी थकबाकी वसुली कर्जमुक्ती इत्यादी विषयावर राजेंद्र कोरे यांनी तर व्याजदर कमी करणे इत्यादी विषयावर संतोष अहिरे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
टी आर पाटील एस डी कासार दशरथ कांबळे शिवाजी सोनाळकर गोरख वातकर इत्यादींनी विविध विषयावर मते मांडली,.
संचालक शिवाजी भोसले यांनी प्रास्ताविक केले मच्छिंद्र नाळे यांनी सूत्रसंचालन केले विकास कांबळे यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले.
यावेळी आनंद हिरुगडे, राजेश कोंडेकर, अनिल सरक, छाया हिरुगडे,अशोक पाटील ,कुमार पाटील व तज्ञ संचालक भरत रसाळे इत्यादी उपस्थित होते.
सभा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक सदाशिव साळवीी, लेखापाल सुबोधकुमार कोल्हटकर,लिपिक रमेश गंजाळ, कुणाल भालकर व सेवक ऋषिकेश बोडके इत्यादींनी परिश्रम घेतलेे.










