शिक्षकांनी ज्ञानाची उंची वाढवा-प्राचार्य अभयकुमार साळुंखे
शिक्षकांनी आपल्या ज्ञानाची उंची वाढवा..- प्राचार्य अभयकुमार साळुंखे,
विवेकानंद महाविद्यालयात BSC अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ.,
अत्याधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानासाठी महाविद्यालयाला 2 स्मार्ट इंटरॅकटिव्ह डिजिटल बोर्ड प्रदान
कोल्हापूर/मारुती फाळके
सत्य,प्रामाणिकपणा,कठोर परिश्रम,उत्तम चारित्र्य, मातीसाठी त्यागीभावना, सेवाभावीवृत्ती हे गुण अंगी बाळगून शिक्षकी पेशासाठी सेवाव्रत जपा, येणारा काळ आव्हानात्मक आहे यासाठी आपल्या ज्ञानाची उंची वाढवा, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले ते विवेकानंद महाविद्यालयात BSC भाग ३ च्या विद्यार्थी निरोप सदिच्छा समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर. कुंभार होते.
साळुंखे पुढे म्हणाले, सेवाकाळात ज्ञान, विज्ञान, सुसंस्कार अभिव्यक्ती व आचरणात आणा. स्वामी विवेकानंद ही संस्था शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे हे पेशाने शिक्षक असणाऱ्या व्यक्तिमत्वाने उभी केली असून आज अनेक शिक्षकांच्या दातृत्वातून विस्तारलेली ही संस्था मोठी होतेय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.समाज,पालक,शिक्षक, विद्यार्थी यांच्या चिंतनातून ही संस्था महाराष्ट्रभर ज्ञानार्जन करत आहे.भविष्यात येणारी आव्हाने पेलण्यासाठी या ज्ञानकेंद्रातून मनाला ऊर्जा आणि उभारी घ्या,व्यासंग वाढवा आणि बहुजनांची लेकरं घडवा असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेकानंदचे प्राचार्य आर. आर. कुंभार म्हणाले, या संस्थेला फार मोठी दैदीप्यमान परंपरा आहे. या संस्थेसाठी शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे अशा असंख्य त्यागी गुणीजणांनी घेतलेल्या परिश्रमातून ही संस्था नावारूपास आली आहे.त्याग आणि समर्पण भावनेने प्रचंड कष्ट सोसलेल्या अनेक गुरूंच्या कष्टातून ही संस्था उभी राहिली आहे., येणारा काळ खूप आव्हानात्मक आहे. येऊ घातलेले संकट मोठे आहे. सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अनेक त्रुटी आहेत.या धोरणातील तरतुदी आणि वास्तव परिस्थिती भिन्न आहे.सुधारित शै. धोरणात शिक्षक विद्यार्थी प्रमाण १:२० आहे. परंतु कनिष्ठ महाविद्यालयातील परिस्थिती बघितली तर एका वर्गामध्ये १२० विद्यार्थी असतात,ही विसंगती आहे. इथून पुढच्या काळामध्ये शिक्षकांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे., राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधील अटी आणि तरतुदींचा अभ्यास शिक्षकांनी करावा नाहीतर भविष्यात बहुजन समाजाचा शिक्षणाचा हक्क अधिकार हिरावला जाऊन केवळ धनिकांचे शिक्षण राहील आणि बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात येईल. सद्याची आव्हानात्मक स्थिती पाहता शिक्षकांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. यासाठी शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे आवश्यक आहे. आगामी काही वर्षात लवकरच विवेकानंद महाविद्यालयास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.तेव्हा विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक संकुलात संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना विवेकानंद कॉलेजचे केंद्रसंयोजक प्रा.डॉ. सुनील भोसले म्हणाले, २०१४ साली डाएटने हा अभ्यासक्रम चालवण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर हा अभ्यासक्रम चालवण्याची धुरा विवेकानंद महाविद्यालयाकडे आली.या क्षणापासून महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक वाढलेली आहे. २०१९ च्या कोरोना महामारीच्या काळात प्रवेशित विद्यार्थीसंख्या तब्बल ४२० झाली. या कालखंडामध्ये “ज्ञानगंगा घरोघरी” व “वंचितांसाठी शिक्षण, हा विचार घेऊन जिल्ह्यातील आणि जिल्हयाबाहेरील विद्यार्थ्यांना ऑनलाइन- ऑफलाईन अध्यापनातुन अभ्यासक्रम वेळोवेळी पूर्ण करून लेखी व प्रात्यक्षिक काम पूर्ण करून घेतले आहे. यासाठी या कॉलेजचे प्राचार्य,प्रशासन सहकारी प्राध्यापक व प्रशासन यांचे मला सहकार्य लाभले आहे. विद्यार्थ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदी आणि अधिनियमांच्या अधीन राहून स्वतः काळाप्रमाणे बदलावे शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा आणि विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देण्यास आपण स्वतःमध्ये बदल करून घ्यावा, असेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य आर. आर. कुंभार,केंद्रसंयोजक प्रा.डॉ. सुनील भोसले,प्रा.डॉ. अजिंक्य पत्रावळे, प्रा.मेहुल जाधव, प्रा. नितेश जाधव, प्रा.आयुब मुल्ला, प्रा.रवींद्र दिंडे, प्रा.अफसाना सय्यद, प्रा.समीना सय्यद,प्रा. मंगेश मगदूम, विशाल बुचडे या सर्वांचे भेटवस्तू देऊन BSC भाग ३ च्या विद्यार्थ्यांच्या वतीने भेटवस्तू,वृक्ष देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास संदीप माने,संजय रोगे,जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, शिक्षक बँकेचे संचालक अमर वरुटे,दिलीप नंदिवाले, शशिकांत उगलमुगले,सर्जेराव सुतार, श्रीकांत माणगावकर,मारुती फाळके,शशी पाटील, आनंद पाटील, तुषार पाटील, सनी चौगुले, संजय पाटील, सुरेश कोळी, विजय फासे, विश्वनाथ बोराटे, आनंद कांबळे,सागर पाटील,सनी सुतार, सुनील खिलारे ,रुपेश बागडी, विजय कांबळे ,एकनाथ कांबळे, दीपक कांबळे, दस्तगीर फकीर,उत्तम पाटील,संजय खुडे,निलेश कारंडे,चेतन शिंदे,संदीप शेंडगे,रवींद्र केदार, सुभाष पाटील,आनंद कांबळे,विठ्ठल पाटील,अनिल पाटील,संजीवकुमार सुतार,प्रकाश भोसले,समीर पटेल, सुहासिनी पाटील,सुषमा नागरगोजे,कविता पाटील,उज्ज्वला पाटील,संबोधी गायकवाड,सविता महाडिक,सुहास कदम,विशाल देसाई,दीपक गायकवाड, अमित कांबळे, रश्मी कांबळे,आदीसह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. ,यावेळी प्रा.डॉ.अजिंक्य पत्रावळे,सतीश गुरव,डॉ.स्वाती पाटील,दस्तगीर फकीर,बालाजी पांढरे आदींनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमास BSC भाग २ व ३ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ .सुनील भोसले,सूत्रसंचालन नकुशी देवकर,तर आभार शरद दिवसे यांनी मानले.
……..अभयकुमार साळुंखे चे मार्मिक बोल!-
शिक्षकी पेशा हे सतीचं वाण……. शिक्षकी पेशा हे सतीचं वाण आहे,स्वतःमध्ये बदल करा,शैक्षणिक अर्हता वाढवा, त्याग व कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवा,बापूजी साळुंखे च्या देहाचे वास्तव्य असलेल्या या मातीतून मनाला ऊर्जा आणि उभारी या ज्ञान संकुलातून घेऊन जा., असे मार्मिक बोल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना सांगून वास्तवाची जाणीव करून दिली.










