भेडसगाव नागरीचे नवे पाऊल मोबाईल ॲप,लवकरच मुंबईत ३ शाखा – हंबीरराव पाटील.
भेडसगाव नागरीचे नवे पाऊल मोबाईल ॲप,लवकरच मुंबईत ३ शाखा -संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील भेडसगावकर
३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.
भेडसगाव/ मारुती फाळके
बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर भेडसगाव नागरी पतसंस्थेने ही नाविन्याचा स्वीकार करत मोबाईल ॲप निर्माण केले असून लवकरच सभासदांच्या मोबाईलवर पतसंस्थेचे मोबाईल ॲप, ई-व्यवहार तसेच आगामी काही महिन्यात मुंबईमध्ये नवीन तीन शाखा, व्यवसायवृद्धी, शाखा विस्तार करण्याचा मानस संस्थेचे संस्थापक चेअरमन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती हंबीरराव पाटील भेडसगावकर यांनी व्यक्त केला, ते संस्थेच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रारंभी सभेचे प्रास्ताविक एन टी पाटील, विषय पत्रिकेचे वाचन जनरल मॅनेजर संजय पाटील यांनी केले.
हंबीरराव पाटील बोलताना म्हणाले,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेल्या संस्थेने आज शहरी भागातही दमदार वाटचाल सुरू केली असून दीडशे कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. संस्थेच्या कर्जदार सहाय्य योजना, सभासद- कर्मचारी मेडिक्लेम, आरटीजीएस, एन एफ टी सुविधा, दरवर्षी डीव्हीडंड वाटप, एसएमएस सुविधा दीपावलीला बोनस अशा सभासदहिताच्या अनेक योजना राबवून संस्थेने पारदर्शक कारभाराचा पायंडा घालून दिला आहे., भविष्यात मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यात शाखा विस्तार करणार असून सभासदांनी संस्थेच्या कार्यपद्धतीवर दृढविश्वास दाखवल्याचे सांगितले.
यावेळी युवा नेते, प्रथम लोकनियुक्त सरपंच,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसिंह पाटील म्हणाले, काळाबरोबर संस्थेने आपल्या कार्यपद्धतीत बदल करून अभिनव कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे.,नवीन इमारतीसाठी येत्या काळात ठोस निर्णय घ्यावा लागेल,पारदर्शी कारभार आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळेच पतसंस्थेचा नावलौकिक होत आहे.व्यवसाय वृद्धीसाठी कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी मारुती फाळके,रणजीत पाटील, आप्पासो साळुंखे, पांडुरंग डांगे, बाळासाहेब पाटील, महादेव काटकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास संचालक महादेव बुवा, राजेंद्र कुसळे, विलास यादव,गणपती पाटील,सर्जेराव पाटील, जयसिंग लगारे, लक्ष्मण पाटील,शिवाजी पाटील,संग्राम पाटील, आबा घाडगे,शामराव कदम, धोंडीराम चौगुले, आकाराम तांबे,नरेंद्र गायकवाड,सागर पाटील,प्रशांत नाईक, दीपक पाटील,गोविंद पाटील, राजू मस्कर, बाबासो नाईक, बाबासो पाटील इंदुताई पाटील बाळाबाई पाटील,तसेच सभासद,ठेवीदार,हितचिंतक,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा, संस्था कर्मचारी, पिग्मी एजंट यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत कोकाटे तर आभार कृष्णदेव चौगुले यांनी मानले.
.……..आजारपणाच्या काळात मेडिक्लेम योजनेचा आधार
संस्थेने सुरू केलेल्या मेडिक्लेम योजनेचा फायदा सभासद कर्मचारी यांना होत असून अडचणीच्या काळामध्ये ही योजना आधार ठरत असल्याचे समाधान हंबीरराव पाटील यांनी बोलताना सांगितले.
फोटो कॅप्शन-
३५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन हंबीरराव पाटील, अमरसिंह पाटील,पांडुरंग डांगे,आप्पासो साळुंखे,बाळासाहेब पाटील, महादेव बुवा, राजेंद्र कुसळे, विलास यादव व सर्व संचालक.










