सत्ताधाऱ्यांच्या ताळेबंदात अनेक बाबी चुकीच्या-राजाराम वरुटे गट
सत्ताधाऱ्यांच्या ताळेबंदात अनेक बाबी चुकीच्या-राजाराम वरुटे गट
सर्व प्रश्नांना उत्तरे हवीत अन्यथा जशास तसे उत्तर : राजाराम वरुटे, संभाजी बापटांचा इशारा.
कोल्हापूर :प्रतिनिधी
“सध्याच्या संचालक मंडळाने या २०२२-२३ अहवाल सालात प्रसिद्ध केलेल्या ताळेबंदमध्ये अनेक बाबी चुकीच्या केलेल्या आहेत. या वर्षी दाखविलेला नफा, एनपीएची तरतुदी चुकीची आहे . कर्जाचा व्याजदर हा रिझर्व्ह बॅँकेच्या नियमाला धरुन नाही. यासह अन्य प्रश्ने मुदतीत बँक प्रशासनाकडे दिली आहेत. तसेच सभेपुढे मांडणार आहोत. सभा शांततेत पार पाडण्यासाठी नक्कीच सहकार्य करू, पण सभेत प्रश्नांना उत्तरे न देता सभा आटोपण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसे उत्तर देऊ.”असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शिक्षक नेते,शिक्षक संघाचे (शि द पाटील गट)राज्य सल्लागार राजाराम वरुटे, शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट व इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत शिक्षक बँकेच्या सत्तारुढ मंडळीच्या विविध निर्णयावर आक्षेप नोंदविला. प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, (१७ सप्टेंबर) होत आहे. सभेच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत तू तू मैं मैं सुरू झाल्यामुळे सभा गाजण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
सत्ताधारी मंडळींनी तेरा वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच लाभांश वाटपाची घोषणा करताना मागील संचालक मंडळावर निशाणा साधला होता. सत्ताधाऱ्यांचे तेरा वर्षात लांभाश वाटप झाले नाही हे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत वरुटे व बापट यांनी गेल्या काही वर्षातील लाभांश वाटपाची आकडेवारी कागदोपत्री जाहीर केली. तसेच मागील संचालक मंडळाचा ३१ मार्च २०२२ अखेर एकूण ३३ कोटी २६ हजार खर्च होता. आताच्या संचालक मंडळाचा ३१ मार्च२०२३ अखेर ३४ कोटी ५७ लाख ४८ हजार रुपये इतका खर्च आहे, मग काटकसर कोठे केली ?
या पत्रकार परिषेदत बोलताना शिक्षक संघाच्या (माजी आमदार पाटील गट ) पदाधिकाऱ्यांनी,“यंदा सत्ताधाऱ्यांनी दाखविलेला नफा, एनपीएची तरतुदी चुकीची असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, ‘ २०२१-२२ मध्ऋये कार्यरत संचालक मंडळाने दाखविलेला नफा हा चुकीचा होता असे ऑडिटर व बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. म्हणून त्यावेण्ळी सात टकके मिळणारी लाभांशच्या रकमेचा नफा सध्याच्या संचाालक मंडळाने तरतुदी केल्या नाहीत म्हणून इतर बाबीकडे वळवला. मग या वर्षी सुद्धा त्याच ऑडिटरला लेखापरीक्षण का दिले ? मग यावर्षी सुद्धा नफा चुकीचा आहे असे आमचे मत आहे. त्यांनी यावर्षी लेखापरीक्षकय बदलायला हवा होता, पण तसे केला नाही.”
“गेल्या अहवाल सालात २ कोटी ३८ लाख ३४ हजार ७७४ एवढा विक्रमी नफा झाला होता. सभासदांना सात टक्के डिव्हीडंड दिला असता तर येथून पुढे एवढा डिव्हीडंड आपणास देता येणार नाही. सभासद जाब विचारतील म्हणून डिव्हीडंड न वाटता या संचालक मंडळाने गरज नसताना इतर तरतुदी केल्या आहे, सभासदांना डिव्हीडंड देता येत नाही म्हणून गवगवा केला. कर्जाचा व्याजदर हा रिझर्व्ह बॅँकेच्या नियमाला धरुन नाही. सध्या बँकेच्या कर्जाचाा व्याज दर दहा टकके आहे. आकस्मिक कर्जाला ९.५० टक्के केला आहे. आकस्स्मिक कर्ज हे व्याजदर ९.५० टन्क्के केल्यापासनू घेतले असेल तर त्याला लागू आहे. पूर्वीच्या आकस्मिक कर्जाला दहा टकके व्याजदर आहे. कर्ज एकच पण दर वेगळे का ? हा रिझर्व्ह बँकेचा नियम मोडून काम चालू आहे. ”असा आरोप देखील यावेळी केला.
पत्रकार परिषदेला बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, राजमोहन पाटील, दिलीप पाटील, जी. एस. पाटील, साहेब शेख, बजरंग लगारे, जिल्हाध्यक्ष बी. एस्. पाटील, डी. पी. पाटील, स्मिता डिग्रजे, स्मिता खांडेकर, राधानगरीचे बी. एस. पाटील, रवींद्र नागटिळे आदी उपस्थित होते.










