May 14, 2026

ताळेबंद,कर्जरोखे,नफा विभागणी,अमृतसंजीवनी योजनेवरून शिक्षक बँकेची जनरल सभा गाजली

0
20230918_070710

ताळेबंद,कर्जरोखे, नफा विभागणी, अमृतसंजीवनी योजनेवरून शिक्षक बँकेची जनरल सभा गाजली.

चेअरमन सुनील एडके यांचा मुत्सद्दीपणा आणि संयमाने सभा शांततेत पार पडली.

कोल्हापूर/ मारुती फाळके.

प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था असलेल्या शिक्षक  बँकेत गत तेरा वर्षात झालेल्या नोकर भरतीची चौकशी करण्यासह,सरकारी कर्जरोखे,ताळेबंद मंजुरी,बुडीत निधीला केलेली तरतूद यावरून बँकेच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके यांनी केले, ते बँकेचे ८४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

 

गतवर्षीचा ताळेबंद, नफा तोटा पत्रक मंजुरीसह, अमृत संजीवनी वरून सत्तारूढ विरोधकांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ गोंधळ उडाला.आरोप प्रत्यारोपा वरून सत्तारूढ विरोधकांच्यात तू तू – मै मैं झाले.,पण शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके मुत्सद्दीपणाने व संयमाने सभा शांततेत हाताळली.दरम्यान सभेच्या आदल्या दिवशी विरोधी आघाडीकडून पत्रकार परिषद घेऊन नफा तोटा ताळेबंदावरून जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता, या कारणावरून ही सभा वादळी होईल असे वातावरण तयार झाले होते,परंतु सभेच्या सुरुवातीपासूनच बँकेचे अध्यक्ष सुनील एडके यांनी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आपण या बँकेचे सभासद आहोत,शासकीय कर्जरोखे विकून बँकेला अडचणीत आणण्याचा, बँकेच्या घसरलेल्या आर्थिक स्थितीला मागील संचालक मंडळ कसे जबाबदार आहे हे त्यांनी पुराव्यासह मांडले. या बँकेला चांगले दिवस येण्यासाठी आपण हातात हात घालून काम करूया असे आवाहन करून प्रस्ताविकपर भाषणात अनेक मुद्द्यांचा उहापोह केलाच पण शेरोशायरीने खोचक चिमटे देखील काढले.

 

संदीप मगदूम यांनी चुकीचा नफा दाखवल्यामुळे बँकेला कोट्यावधी रुपयांचा टॅक्स भरावा लागला, खोटा नफा दाखवून बँकेचे नुकसान करणाऱ्या मंडळीवर जबाबदारी निश्चित करून संबंधिताकडून ती वसूल करावी अशी मागणी केली. अशोक पाटील- तिरपणकर यांनी बँकेत झालेल्या नोकर भरतीची चौकशी करण्याची मागणी केली, यावर प्रसाद पाटील यांनी त्यांची पाठ थोपटून समर्थन केले., व या नोकर भरतीत व्यासपीठावरील सुरेश कोळी,अरुण पाटील, डी एम पाटील हे संचालक सुद्धा सामील होते असे सांगून सभागृहाचे लक्ष वेधले. सभासदांसाठी आरोग्यविमा चालू करावा अशी मागणी मनोजकुमार रणदिवे यांनी केली. डीसीपीएस धारकांसाठी सहा लाखा ऐवजी दहा लाखाची मदत द्यावी अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेचे संतोष गायकवाड यांनी केली. डीसीपीएस आणि मसक योजनेत बदल केल्याबद्दल संचालकाच्या अभिनंदनाचा ठराव जुनी पेन्शन संघटनेचे मंगेश धनवडे यांनी मांडला.शिक्षक संघाचे मारुती दिंडे यांनी सुरक्षा ठेव कोणत्या कारणासाठी ठेवली आहे? एटीएम बंद चे कारण यावर प्रश्न विचारला.यावर एटीएम मधून सायबर क्राईम मधून जास्त होते.,एटीएम साठी वर्षाला पाच ते सहा लाख रुपये खर्च येतो. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी एटीएम बंद ठेवले आहे असे उत्तर अध्यक्ष एडके यांनी दिले.माजी संचालक प्रशांत पोतदार यांनी नफा तोट्याची तरतूद कशासाठी आणि बँकेवर नियुक्त केलेले पालक प्रशासन अधिकारी यांची नेमणूक कधी झाली या परिपत्रकाचे वाचन करावे अशी मागणी केली. सुनील सुतार यांनी पश्चिम पन्हाळा- गगनबावडा या तालुक्यातील शिक्षकांच्या सोयीसाठी कळे येथे उपशाखा सुरू करावी अशी मागणी केली.तसेच संचालक निवास स्थानाप्रमाणे सभासद निवास स्थान असावे अशीही मागणी करण्यात आली.

 

अमृत संजीवनी योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. अमृत संजीवनीसाठी सभासदांच्या कायम ठेवीतून ५०००० रुपये घेण्यासाठी विरोधकांनी विरोध दर्शविला.,यावर चेअरमन एडके म्हणाले DCPS धारकांच्यासाठी म.स.क. योजना आणताना आपण १५००० रुपये घेतले होते.,मग या योजनेला विरोध का??असा प्रतिप्रश्न केला. हेमंत भालेकर यांनी सरकारी कर्जरोखे विकून बँकेचे नुकसान करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. मनोज रणदिवे वसुलीसाठी वसुलीचे शाश्वत धोरण ठरवा. आजरा,मुरगूड कोडोली, गडहिंग्लज या शाखेचा नफा कमी असताना तिथे कर्मचाऱ्यांच्या पगारावर वारेमाप खर्च होतो ही बाब निदर्शनास आणून दिली.

 

सुनील एडके यांनी संयम आणि हजारजबाबीपणाने सभा शांततेत हाताळली. एडके यांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकातून शेरोशायरीने अनेक गत कारभारावर अनेक खोचक चिमटे काढले, हजरजबाबीपणाने सभा चांगली हाताळली., विरोधकांच्या यापूर्वी केलेल्या चुका यावर बोट ठेवत त्यांनी गेल्या वर्षी लाभांश का दिला नाही? अहवाल सालात नफा कमी झाला? सरकारी कर्जरोखे विकून खोटा नफा दाखवला. गेल्या तेरा वर्षातील विरोधकांच्या चुकीच्या कारभारामुळे बँकेची आर्थिक स्थिती घसरल्याचे सांगितले. सभासदांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला संयमाने उत्तर देत त्यांनी सभा अत्यंत यशस्वीपणे हाताळली.,यावरून त्यांच्या नेतृत्व गुणाचे कौशल्य सिद्ध होते.

 

प्रारंभी सभेचे अहवालवाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम यांनी केले.यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. सुमारे पाच तासाहून अधिक काळ सभेचे कामकाज चालले. दरम्यान शिक्षक बँकेच्या जनरल सभेपूर्वी सहकार विभागाच्या निर्देशानुसार सभासदांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सहकार प्रशिक्षण शंकर मांगलेकर यांनी दिली. वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्वागत बँकेचे व्हा. चेअरमन शिवाजी बोलके यांनी तर आभार शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे -पाटील यांनी तर सूत्रसंचालन महेश घोटने यांनी केले.

 

शिक्षक बँकेच्या जनरल सभेसाठी संचालक अर्जुन पाटील, एस व्ही पाटील, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, शिवाजी रोडे पाटील,बाळकृष्ण हळदकर,बाबू परीट,नंदकुमार वाईंगडे,अमर वरुटे, गजानन कांबळे, पद्मजा मेढे,वर्षा केनवडे, रामदास, झेंडे, गौतम वर्धन, सुरेश कोळी, तज्ञ संचालक धनाजी रावण, संभाजी पाटील, सुरेश पाटील, अर्जुन जानकर, सुकाणू समितीचे नेते जोतीराम पाटील,प्रमोद तोंदकर,रवी पाटील,विलास चौगुले,सुनील पाटील,रघुनाथ खोत, तानाजी घरपणकर,संजय कुर्डुकर,संजय दाभाडे यासह बँकेचे सभासद,अधिकारी कर्मचारी, महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


महिलांची उपस्थिती लक्षणीय…..

या सभेत प्रथमच जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून महिला सभासद बहुतांशी संख्येने उपस्थित होत्या. शिक्षक संघाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर, माजी संचालिका स्मिता डिग्रजे यांनी सत्तारूढ गटाच्या काही मुद्द्यावर बोट ठेवत आक्षेप नोंदवला.अमृत संजीवनी योजनेला त्यांनी प्रखर विरोध केला.

…———————————

शिक्षक बँक नोकर भरतीची चौकशी करणार – चेअरमन सुनील एडके….

तेरा वर्षात शिक्षक बँकेमध्ये अनावश्यक नोकरभरती करून बँकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे चेअरमन एडके सांगितले. डीसीपीएस धारकांच्या मसक योजनेसाठी सभासदांच्या कायम ठेवीतून तत्कालीन संचालक मंडळांने पंधरा हजार रुपयांची तरतूद केली होती., मग अमृत संजीवनी योजनेला विरोध हा विरोधाला विरोध म्हणून आहे,विरोधकांनी बँकेचे हित पहावे. बँकेच्या हितासाठी राजकारण विरहित प्रामाणिक सभासद म्हणून बँकेची उन्नती साधण्यासाठी निकोप दृष्टिकोन ठेवावा.

—————————————–

अमृत संजीवनी योजनेला विरोधच…माजी चेअरमन बाजीराव कांबळे

विद्यमान संचालक मंडळांनी बँकेमध्ये अशा किती तरतुदी केल्या,त्याची समर्पक उत्तरे दिली नाहीत. घसारा, ग्रॅज्युटी, नोकर रजा पगार,यावर पुरेशी तरतूद केलेली नाही. अमृत संजीवनी योजना ही सभासदांच्या तोट्याची असून या योजनेचे स्वरूप व्यवस्थितरित्या मांडलेले नाही. अमृत संजीवनी योजनेला आमचा विरोध राहील.. ——-बाजीराव कांबळे माजी चेअरमन शिक्षक बँक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!