March 26, 2026

लाभांश न वाटता ५८ लाख जादा तरतूद का केली याबाबत सीईओ निरूत्तर -प्रसाद पाटील

0
IMG-20230918-WA0062

लाभांश न वाटता ५८ लाख जादा तरतूद का केली याबाबत सीईओ निरूत्तर — प्रसाद पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी

मागील जनरल सभेतील ताळेबंद मंजुरी व गरज नसताना बीडीडीआर तरतूद या विषयावर बँक सीईओ मंगदूम यांना धारेवर धरले असता त्यांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत.
लाभांश न वाटता ५८ लाख जादा तरतूद का केली याबाबत सीईओ निरूत्तर झाले. काल शिक्षक बँकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्व भूमीवर शिक्षक बँकेचे माजी संचालक व पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राजाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी कोल्हापूर टाइम्स 24 शी बोलताना आपले मत व्यक्त केले.

 

दि.१८/०९/२०२२ रोजीच्या जनरल सभेत ज्या बँक सीईओ यांनी सन २०२१-२२ चा ताळेबंद खोटा आहे असे सांगत, सदर ताळेबंद सभेने नामंजूर केला असल्याचे सांगितलेले होते, त्यांनीच सदर ताळेबंद सभेच्या इतिवृत्तात मंजूर लिहला असल्याचे आज वाचन केले.

 

ज्या ताळेबंदातील काही खर्चांवर व तरतुदी बाबत त्यावेळच्या संचालक मंडळ सभेत आम्हीही चौघां विरोधी संचालकांनी लेखी विरोध नोंदवला होता, तो ताळेबंद आज यांनी मंजूर म्हणून लिहून तसे वाचले याचे आश्चर्य वाटले.
गेले वर्षभर मनात प्रश्न घुमत होता.. यांनी सन २०२१-२२ चा सर्व ताळेबंद नामंजूर केला असताना फक्त नफा विभागणीस मंजुरी दिली.. हे सहकाराच्या कोणत्यात तत्वात बसते? खरं तर सर्व ताळेबंद नामंजूर असेल तर नफा पण नामंजूरच असायला हवा होता. त्या प्रश्नाचे उत्तर आज मिळाले. आणि काहीही तरतुदी वगळता तो ताळेबंद योग्यच होता हे यांनीच सिद्ध केले.

 

मागील जनरल सभेत नफा विभागणी करताना आरबीआय चे नाव पुढे करत चुकीच्या पध्दतीने बीडीडीआर (संशयित बुडीत कर्ज निधी) ला १ कोटी ०५ लाख रूपये वर्ग करून सभासदाना़ं मागील वर्षी हक्काच्या लाभांशापासून वंचित ठेवले होते.
याबाबत बँक सीईओ यांचेकडे आरबीआय बँकेचे पत्र मागितले असता त्यांना ते देता आले नाही किंवा दाखविताही आले नाही.
याबाबत किती तरतूद करणे आवश्यक होती असे विचारले असता रू. ३ कोटी ५८ लाख असे सीईओंनी उत्तर दिले.
पण प्रत्यक्षात यांनी रू. ४ कोटी १६ लाख तरतूद करून ५८ लाखाची जादा तरतूद का किली?
हे ५८ लाख मागील वर्षी २ % प्रमाणात सभासदांना लाभांश रूपाने का वाटले नाहीत.?* या बाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
बँक व सभासदांच्या हितासाठी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता गेली २५ वर्षे आमचा संघर्ष सुरू होता, सुरू आहे व सुरूच राहणार.असे प्रसाद पाटील यांनी कोल्हापूर टाइम्स शी बोलताना सांगितले.

 

बँकेचे विद्यमान चेअरमन मा.सुनिल एडके यांचे मनापासून आभार..मानतो की त्यांनी आम्हा काही विरोधी संचालकांचे अभिनंदन केले कारण आम्ही नेहमी चुकीच्या कारभाराला विरोध केला.
गत संचालक मंडळींच्या कार्यकाळात आम्ही चौघे विरोधी संचालक सत्तेतच सामील होते आशा वल्गना करून काही लोक आम्हाला बदनाम करू पाहत होते. सत्तेत सामीलच व्हायचेच असते तर आम्हीही त्यावेळी चेअरमन झालो असतो.,हे साधे सुत्र असे बोलणा-यांना कळू नये याचे आश्चर्य वाटत होते.
पण काल झालेल्या जनरल सभेत विद्यमान चेअरमन यांनी आमच्या कार्यकालातील मागील सात वर्षातील प्रोसिडिंगमध्ये आम्हां चार विरोधी संचालकांचा (प्रसाद पाटील, सुरेश कोळी, डी.जी.पाटील व लक्ष्मी पाटील) यांचा नामोल्लेख करत वेळोवेळी विरोध नोंदवल्याबद्दल अभिनंदन करून विरोध नोंदवलेल्या पैकी २-३ लेखी पत्रांचे वाचनही करून सभागृहात सर्व सभासदांसमोर आमच्या विरोधी भूमिकेबद्दल वस्तुस्थिती मांडली. त्याबद्दल मा.चेअरमन सुनिल एडके सर यांचे मनापासून आभार मानतो.मान.चेअरमन यांनी माजी विरोधी संचालकांचे अभिनंदन केलेबद्दल मनापासून आभार मानतो.
वस्तुस्थिती मांडताना दाखवलेल्या मनाच्या मोठेपणास सलामच राहील.असेही ते म्हणाले.

 

तत्कालीन नोकर भरती बाबत बोलताना ते म्हणाले,
नोकर भरती तत्कालीन सत्ताधारी मंडळींनी केली हे माहिती असतानाही,
आम्ही वेळोवेळी याबाबत समर्पक उत्तरे दिले असतानाही..
तोच तोच प्रश्न पुन्हा पुन्हा आम्हाला न विचारता तत्कालीन सत्ताधाऱ्यांना व आता यांच्या सोबत सत्तेत असलेले माजी संचालक सुरेश कोळी, अरूण पाटील व डी.जी.पाटील यांना विचारला तर अधिक समर्पक उत्तर मिळेल. यापुढे हा प्रश्न त्यांना विचारावा.
कारण
आम्ही कधीच सत्तेत नव्हतो आणि नाही.
बँक व सभासद हितासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील असे महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक
संघटनेचे राजाध्यक्ष व शिक्षक बँकेचे माजी संचालक प्रसाद पाटील म्हणाले.

 

यावेळी पुरोगामी चे जिल्हाध्यक्ष एस के पाटील,शंकर पवार,पी आर पाटील,बाबासो रनसिंग,काशिनाथ बिरुनगी,अशोक खाडे,अशोक शिवणे,तुषार पाटील,बाबू केसरकर, के एस पाटील,शारदा वाडकर,अलका थोरात,प्रमिला माने,गीता कोरवी,वासंती हारुगडे,भारती चोपडे,मनीषा गुरव,प्रेरणा चौगुले,राजश्री पिंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!