March 26, 2026

छ.शिवाजी शिक्षक पतसंस्थेचा १७% लाभांश-एस व्ही पाटील

0
IMG-20230921-WA0015

छ.शिवाजी शिक्षक पतसंस्थेचा १७% लाभांश, स्व मालकीच्या इमारतीचा मानस.- संस्थापक चेअरमन एस व्ही पाटील

कोल्हापूर टाइम्स/ मारुती फाळके

छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ९ लाख १३ हजार रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना यंदा १७ टक्के लाभांश देण्यात येणार आहे अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, शिक्षक बँकेचे संचालक एस. व्ही. पाटील यांनी दिली. संस्थेने नजीकच्या कालावधीत संस्थेसाठी स्वमालकीची वास्तू घेण्याचा संकल्प असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

   

पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (२४ सप्टेंबर २०२३) होत आहे.श्री केदारनाथ सांस्कृतिक भवन पोवार कॉलनी, क्रशर चौक, राधानगरी रोड येथे सकाळी ११.३० वाजता वार्षिक सभा आहे. दशकपूर्तीचा टप्पा ओलांडून संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. संस्थेच्या प्रगतीविषयी सांगताना चेअरमन पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी शिक्षक पतसंस्थेचा कारभारड हा पारदर्शी व विश्वासार्ह आहे. संस्थेने ऑगस्ट २०२३अखेर आठ कोटी ७५ लाख ३२ हजार इतक्या रकमेचा कर्ज पुरवठा केला आहे. मुदतबंद ठेवीचा आठ कोटी ९० लाख ८७ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. संस्था सभासदांना विविध स्वरूपातील कर्ज म्हणून 32 लाख रुपये उपलब्ध करून देत आहे. संस्थेने १०० टक्के कर्जमाफी योजनाही राबविली आहे. दहा वर्षात एवढा उच्चांकी कर्ज पुरवठा करणारी ही जिल्ह्यातील पहिली पतसंस्था असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

 

पाटील म्हणाले, ‘ सेवानिवृत्त शिक्षक सभासदांना एक लाखापेक्षा ज्यादा रक्कम कर्ज म्हणून दिली जात नव्हती पण संस्थेने सभासदांची अडचण विचारात घेऊन तीन लाख रुपये कर्ज पुरवठा करत आहे. तसेच शिक्षकांना कम्प्युटर साक्षरतेसाठी लॅपटॉप घेतल्यास सभासदांना तो बिनव्याजी रक्कमेत उपलब्ध करून देण्याचा संकल्प संस्थेने पूर्ण केला आहे. सभासदाला शाळेपर्यंत दिवाळी भेटवस्तू पुरवठा करणारी संस्था म्हणून संस्थेने आपला एक वेगळा नावलौकिक मिळवला आहे. सामाजिक जाणिवेतून करवीर पंचायत समितीच्या आवारात पाणपोई सुरू केली आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्ती चाचण्या व शिक्षकांसाठी बहुउपयोगी उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे. यावेळी व्हाईस चेअरमन बाबूराव खोत, संचालक बाळासाहेब माने, राजाराम घुंगुरकर, प्रकाश गायकवाड, गोपाळ कदम, संभाजी एकशिंगे, रामचंद्र माने,अनिल वरूटे ,पद्माताई काळुगडे, माया भिसे, सचिव मनोज माळवदकर, पार्लमेंटरी बोर्ड सदस्य विष्णू काटकर, एकनाथ पाटील, शिवाजी खाडे, काशिनाथ कुंभार, बजरंग कुलगुडे , मारुती माने, अर्जुन कराड उपस्थित होते.
…………………………………….
संस्थेच्या उल्लेखनीय बाबी….
संस्थेला सतत ऑडिट वर्ग अ आहे. संचालक प्रवास खर्च शून्य टक्के. एनपीए शून्य टकके. शंभर टक्के कर्जमाफी योजना, भरघोस लाभ देणारी प्राव्हिडंड फंड योजना. तत्काळ कर्जपुरवठा. सभासद व मुलांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!