March 26, 2026

छ.शिवाजी शिक्षक पतसंस्था सक्षम संस्था-चंद्रकांत वाघमारे,१७% लाभांश

0
IMG-20230928-WA0032

छ.शिवाजी शिक्षक पतसंस्था सक्षम संस्था-चंद्रकांत वाघमारे,१७% लाभांश

कोल्हापूर टाइम्स 24/ मारुती फाळके

 छत्रपती शिवाजी शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेची दहा वर्षातील सर्वंकष प्रगती व सभासदांसाठी दिलेल्या सोयी- सुविधा पाहता संस्थेने शिक्षकांच्यातील एक सक्षम पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे.’असे कौतुकोदगार पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी काढले. दरम्यान पतसंस्थेतर्फे सभासदाना सतरा टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे संस्थापक चेअरमन एस. व्ही. पाटील यांनी घोषित केले.

छत्रपती शिवाजी शिक्षक शिक्षकेतर पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत झाली. या सभेत गुणवंत विद्यार्थी, विविध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पुरस्कारप्राप्त शिक्षक, पतसंस्थेला सहकार्य करणाऱ्या संस्थाच सत्कार करण्यात आला. चंद्रकांत वाघमारे व ललिता वाघमारे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार झाला. . गव्हर्मेंट बँकेचे चेअरमन अतुल जाधव व क्रांती रत्ने पुस्तके लिहून क्रांतिकारकांची गाथा लोकांच्या समोर आणल्याबद्दल शिंदेवाडी शाळेच्या अध्यापिका प्रणिता तेली यांचाही सत्कार झाला.

 

ते पुढे म्हणाले ‘सेवानिवृत्तांना तीन लाख कर्ज व सभासदांनी संगणक साक्षर व्हावे यासाठी बिनव्याजी लॅपटॉपसाठी कर्ज या योजना उपयुक्त आहेत.’ करवीरचे गटशिक्षणाधिकारी समरजीत पाटील म्हणाले नवीन संस्था उभा करून ती नावारूपाला आणणे कठीण असते. दरम्यान छत्रपती शिवाजी पतसंस्थेने संस्थापक एस व्ही पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात केलेले सभासदाभिमुख केलेले काम प्रशंसनीय आहे.’

संस्थापक चेअरमन एस व्ही पाटील म्हणाले, सभासदाभिमुख पारदर्शी कारभार, सभासदांनी एकमुखी व्यक्त केलेला विश्वास व संचालक मंडळाचे पाठबळ या जोरावरच दशकपूर्ती पूर्ण केली आहे. नजीकच्या कालावधीत संस्थेला स्वमालकीची इमारत व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस आहे उच्च शिक्षणासाठी कर्ज पुरवठा करणारी योजना सुरू केली आहे. त्याचाही सभासदांनी फायदा घ्यावा असे त्यांनी घोषित केले.
सचिव मनोज माळवदकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन, सविता रविंद्र कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. व्हाइस चेअरमन बाबुराव खोत यांनी सर्वांचे आभार मानले. पिराजीराव पतसंस्था कागलचे चेअरमन आयलु देसा, व्यवस्थापक संताजी पाटील, पीसी पाटील पतसंस्था गडहिंग्लजचे चेअरमन संभाजी पाटील, संचालक विजय शिंदे, व्यवस्थापक आप्पा शिवणे, शाहूवाडी तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन जयसिंग पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महादेव पाटील,महिला बँकेचे माजी व्यवस्थापक एम एस कुंभार, राजश्री शाहू पतसंस्थेचे माजी चेअरमन बी जी पाटील, विष्णू काटकर, एकनाथ पाटील, शिवाजी खाडे, काशिनाथ कुंभार , मारुती माने, बजरंग कुलगुडे , अर्जुन कराड तसेच संस्थेचे व्हा. चेअरमन बाबुराव खोत, संचालक बाळासाहेब माने, राजाराम घुंगुरकर, संजय बुड्डे, प्रकाश गायकवाड, संभाजी एकशिंगे , अनिल वरूटे ,गोपाळ कदम, रामचंद्र माने,संजय वारके ,पद्मावती काळुगडे, माया भिसे, भारती नानंचे, वंदना माने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!