खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेस २ कोटी वर नफा,सर्वाधिक ४२% लाभांश -चेअरमन शिवाजी भोसले
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेस दोन कोटी वर नफा,सर्वाधिक ४२% लाभांश -चेअरमन शिवाजी भोसले यांचे प्रतिपादन
कोल्हापूर/ मारुती फाळके:-
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेस दोन कोटी एक लाख रुपयाचा नफा झाला असून त्यातून ४२% टक्के लाभांश देण्यात येत आहे अशी घोषणा शिवाजी भोसले यांनी केली,ते खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या ३० व्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते.
चेअरमन शिवाजी भोसले पुढे म्हणाले की , संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री भरत रसाळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने अल्पावधीतच चौफेर प्रगती केली आहे पतसंस्थेने अहवाल सालात तीनशे पासष्ट कोटीची उलाढाल केली असून त्यातून पतसंस्थेस दोन कोटी एक लाखावर नफा झाला आहे. . सभासदांच्या कर्जावरील व्याज दर साडेनऊ टक्के केल्याची माहिती त्यांनी दिली . तसेच पतसंस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सविस्तरपणे दिली. व सभे संदर्भात आलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली .नोटीस वाचन सचिव शिवाजी सोनाळकर यांनी केले, मा चेअरमन यांच्या परवानगीने संस्थापक भरत रसाळे यांनी संस्थेचे कार्यक्षेत्र का वाढवावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले,प्रोसिडिंग वाचन कार्यकारी संचालक सदाशिव साळवी यांनी केले व विषय पत्रिकेवरील सर्वच विषय सभासदांनी बहुमतानी मंजूर केले.
स्वागत व प्रास्ताविक संचालक मच्छिंद्र नाळे यांनी केले. संस्थेचे सभासद श्रीराम विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री सुनीलकुमार पाटील यांनी सर्व संचालक मंडळ सल्लागार समिती सदस्य व कर्मचारी वर्ग यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच ज्ञानदीप विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव चव्हाण व सुहास सुतार यांनी तैलचित्र देऊन संस्थापक भरत रसाळे व चेअरमन शिवाजी भोसले यांचा यथोचित सत्कार केला.
सभेत चर्चेवेळी संचालक राजेंद्र कोरे, संतोष आयरे , राजेश कोंडेकर, माजी चेअरमन महादेव डावरे, राजाराम हुल्ले,गोरख वातकर, कुमार पाटील . अनिल सरक, लालासाहेब पाटील, आनंदा हराळे, रंगराव कुसाळे, जयसिंग पाटील, टी. आर .पाटील, राज मेंगे, अरुण गोते , प्रकाश वांद्रे, नितीन पानारी, अशोक आरंडे, संदीप डवंग, अशोक वायदंडे, पांडुरंग गवळी, सुरेंद्र तिके, विलास बोरचाटे,पिंटू नाईक ,स्नेहलकुमार रेळेकर ,पी. वाय.पाटील ई . सभासदांनी सहभाग घेतला.
सूत्रसंचालन संस्थेच्या संचालिका सौ.वर्षाराणी वायदंडे यांनी केले. आभार व्हा.चेअरमन सौ. माधुरी घाटगे यांनी मानले.
यावेळी संचालक सर्वश्री सूर्यकांत बरगे, मच्छिंद्र नाळे, सातापा कासार,सर्जेराव नाईक, कृष्णात चौगले, वसंत पाटील, अमित परीट, ,रोहिणी एडगे,तसेच सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार, आप्पासो वागरे, पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर, दशरथ कांबळे, सौ. विद्या पाटील कर्मचारी सर्वस्वी सुबोधकुमार कोल्हटकर , रमेश गंजाळ, कुणाल भालकर, विशाल पाटील, अनिरुद्ध पाटील , जैबूनी शेख व असंख्य सभासद उपस्थित होते.










