यशवंत शिक्षक पतसंस्थेला १६ लाख नफा- चेअरमन सदाशिव कांबळे
यशवंत शिक्षक पतसंस्थेला १६ लाख नफा :- चेअरमन सदाशिव कांबळे,
४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
भेडसगाव/मारुती फाळके
शाहूवाडी तालुका प्राथमिक शिक्षकांची यशवंत सहकारी पतसंस्थेला यावर्षी १५,४४,५२६ रुपये इतका घसघशीत नफा झाला असून सभासदांना १४ % डिव्हिडंड व दीपावली भेट रोख ३ % असा एकत्रित १७ % डिव्हिडंड रोख वाटप करण्यात आले.
संस्थेमार्फत गेली सलग ५ वर्षे सभासदांना उच्चांकी १७ % लाभांश वाटप केले जाते.,असे प्रतिपादन चेअरमन सदाशिव कांबळे यांनी केले,ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.
पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संकल्प सिद्धी मंगल कार्यालय येळाणे,शाहूवाडी येथे खेळी मेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी संस्थेचे चेअरमन सदाशिव कांबळे यांनी अहवाल वाचन केले यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.यावेळी झालेल्या चर्चेत संजय तळप,संजय जगताप, किरण शिंदे,शरद पाटील,नामदेव पाटील, मधुकर पाटील यांनी सहभाग घेतला.यानंतर संस्थेच्या सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभासाठी,कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील व सरचिटणीस सुनील पाटील, कोल्हापूर जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन सुनील एडके, व्हाईस चेअरमन शिवाजी बोलके,शिक्षक बँकेचे संचालक अर्जुन पाटील, बाळासाहेब निंबाळकर,बाळकृष्ण हळदकर,गौतम वर्धन,रामदास झेंडे,गजानन कांबळे, अमर वरुटे,पद्मजा मेढे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक बँकेचे शाहूवाडी संचालक श्री.शिवाजी रोडे -पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले तर संस्थेचे माजी चेअरमन तथा संचालक श्री.हेमंत भालेकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा लेखा जोखा मानला. यावेळी संस्थेचे संचालक,सल्लागार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप, किरण शिंदे आणि भानुदास सुतार यांनी केले आभार हेमंत भालेकर यांनी मानले.










