शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्था बिनविरोध
शिवाजी रोडे-पाटील गृहतारण संस्था बिनविरोध.
अल्पावधीत संस्थेची यशस्वी वाटचाल
पारदर्शी आणि सभासदांभिमुख काराभारामुळे ग्राहकांचा विश्वास संपादन
भेडसगाव/मारुती फाळके
शाहूवाडी तालुक्यातील गृहतारण संस्थामध्ये स्थापन झालेली पहिली गृहतारण संस्था तथा मातृसंस्था असणाऱ्या शिवाजी रोडे-पाटील गृहतारण सहकारी संस्था मर्यादित सरूड ता.शाहूवाडी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.शाहूवाडी चे व्ही.जी.जाधव यांनी काम पाहिले
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिक्षक नेते संजय तळप,शिवाजी रोडे-पाटील,हेमंत भालेकर, सदाशिव कांबळे, संजय जगताप, एस. के.पाटील,सर्जेराव काळे,संपतराव पाटील,नामदेव पाटील,उमेश कुंभार,विक्रम पोतदार,एम.एम.गुरव,नाना कांबळे,अर्जुन जानकर,दशरथ आयरे यांचे सहकार्य लाभले.
बिनविरोध निवड झालेले संचालक असे:
सर्वसाधारण प्रतिनिधी –
आनंदराव रघुनाथ हारुगडे,प्रकाश शामराव पाटील,भानुदास पांडुरंग माने,हेमंत वसंत भालेकर,शिवाजी शामराव रोडे-पाटील,संजय सखाराम पाटील,दिनकर शामराव पाटील,किरण मारुती शिंदे,दिलीप रामचंद्र भोसले,अमर रंगराव पाटील,
अनु.जाती प्रतिनिधी – संभाजी शिवाजी साठे,भ.ज. प्रतिनिधी – विजयकुमार पोपट गावडे,
इतर मागासवर्गीय राखीव – प्रतिनिधी- विजय तुकाराम गुरव,महिला प्रतिनिधी – संजीवनी संजय सुर्वे,जयश्री आनंदा कुंभार.
🏵️संस्थेची सांपत्तीक स्थिती
ठेवी :- ११ कोटी ४५ लाख.
कर्जे :- ०७ कोटी ८८ लाख.
गुंतवणूक :- ०५ कोटी ०६ लाख.
एकूण व्यवसाय :- १९ कोटी ३३ लाख.
भाग भांडवल :- १७ लाख ०९ हजार.
निधी :- २३ लाख ६२ हजार.
निव्वळ नफा :- १३,३१,६४५/-
सभासद संख्या :- ३५३










