शिवाजी रोडे-पाटील गृहतारण च्या चेअरमनपदी आनंदा हारुगडे,व्हा.चेअरमन संजय पाटील
शिवाजी रोडे-पाटील गृहतारण च्या चेअरमनपदी आनंदा हारुगडे, तर व्हाईस चेअरमनपदी संजय पाटील .
भेडसगाव/मारुती फाळके
सरुड ता.शाहूवाडी येथील शिवाजी रोडे-पाटील गृहतारण सहकारी संस्था मर्यादित सरूड ता.शाहूवाडी च्या चेअरमनपदी आनंदराव रघुनाथ हारुगडे यांची तर व्हाईस चेअरमनपदी संजय सखाराम पाटील यांची सर्वानुमते निवड झाली.
चेअरमन पदासाठी आनंदराव हारुगडे यांचे नाव मावळते चेअरमन भानुदास माने यांनी सुचविले तर व्हाईस चेअरमन पदासाठी संजय पाटील यांचे नाव संभाजी साठे यांनी सुचविले.
संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच संचालक मंडळ मिटिंगच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता.शाहूवाडी चे व्ही.जी.जाधव साहेब हे होते.
सदर निवडीप्रसंगी संजय तळप,शिवाजी रोडे-पाटील,हेमंत भालेकर,सदाशिव कांबळे,संजय सुर्वे, एस.के.पाटील,सर्जेराव काळे,विष्णू माळी,रघुनाथ शेळके,उमरफारुक आत्तार,आनंदराव कुंभार तसेच संचालक,प्रकाश पाटील,दिनकर पाटील,किरण शिंदे,दिलीप भोसले,अमर पाटील,विजयकुमार गावडे,विजय गुरव,संजीवनी संजय सुर्वे,जयश्री आनंदा कुंभार,आदी उपस्थित होते.










