नागरी बँक सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे
नागरी बँक सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे,उपाध्यक्ष उत्तम पाटील
कोल्हापूर/मारुती फाळके
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राहुल शिंदे (प्राथमिक शिक्षक बँक)यांची तर उपाध्यक्षपदी उत्तम पाटील (यशवंत बँक) यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी विजय येळवडे होते.
यावेळी संचालक दीपक माळी, सयाजी जाधव, नंदकुमार दबडे, अमोल मुदगल, संजय देसाई, कृष्णात पाटील, दत्तात्रय पाटील, अनिल रेंदाळे ,संतोष काळे, मनोज शिंदे ,सुभाष बागडे, रूपाली सावंत, अस्मिता पाटील, सुभाष चौगुले, बी.आर. पाटील, बाबासो गुरव ,अजित पाटील, रामराव गुजर ,सुभाष घाडगे, जयसिंग कोरे उपस्थित होते. संस्थेच्या सभासदांना केंद्रबिंदू मानून पारदर्शक ,सभासद हिताचा कारभार करू.सर्वांचे विश्वासच पात्र राहू अशी ग्वाही अध्यक्ष शिंदे यांनी दिली.










