March 24, 2026

जि.प.कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम वावरे, व्हा.चेअरमनपदी सचिन गुरव

0
IMG-20240212-WA0044

जि. प. कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम वावरे, व व्हा. चेअरमनपदी सचिन गुरव

कोल्हापूर/मारुती फाळके
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी उत्तम शंकर वावरे व व्हाईस चेअरमनपदी सचिन भिकाजी गुरव यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या निवडी झाल्या.सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निबंधक श्रीमती प्रेरणा शिवदास होत्या.

सोसायटीच्या चेअरमनपदासाठी वावरे यांना संचालक अमर पाटील सूचक व संचालक सरदार दिंडे यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमनपदासाठी गुरव यांना संचालक अजय शिंदे हे सूचक व संचालक श्रीकांत चव्हाण यांनी अनुमोदन दिले. संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक गरुड झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करण्यासाठी आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबद्ध आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात वाढच होत जाईल व त्यामध्ये भरीव वाढ करणेकामी निश्चीत नियोजनबद्द काम करू अशी ग्वाही नूतन चेअरमन वावरे व व्हाईस चेअरमन गुरव यांनी दिली. संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपने, काटकसरीने करणेच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडीवेळी संचालक रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रविंद्र जरळी, अजय शिंदे, संजय शिंदे, सुनिल पाटील, बाजीराव पाटील, नंदिप मोरे, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सुधाकर कांबळे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव. तज्ञ संचालक नारायण आयरे, पांडुरंग पोचार संस्थेचे मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, राजीव परीट, राजाराम वरुटे, एम. एम. पाटील, के. आर. किरुळकर, मनोहर भाट, सात्ताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, रविकुमार पाटील, प्रतिभा शिर्क, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, वगडू परीट, उपस्थित होते. दरम्यान नूतन जर्मन वावरे हे जिल्हा परिषद मुख्यालय येथे माध्यमिक शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक आहेत. तर व्हाईस चेअरमन गुरव हे आजरा येथे ग्रामसेवक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!